आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रविशेष

मा. नगरसेविका सौ प्रिती सातम यांची महापालिका मलनिस्सारण उप अभियंता कार्यालयात धडक .

मा. नगरसेविका सौ प्रिती सातम यांची महापालिका मलनिस्सारण उप अभियंता कार्यालयात धडक .

प्रभाग 52 मधील दूधसागर रस्त्याची दुर्दशा करणार्‍या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नागरिकांच्या शिष्टमंडळा सोबत सहाय्यक अभियंता मलनिस्सारण (प्रकल्प ) यांना धरले धारेवर .

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र 52 मधील दूधसागर रस्त्यावर महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या माध्यमातून नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले हे काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण झाले. त्यासाठी चांगल्या स्थितीत असलेला रस्ता खोदण्यात आला. सदर काम सुरू असताना तसेच पूर्ण झाल्यावर सुद्धा नगरसेविका प्रिती सातम यांनी अधिकारी व ठेकेदार यांना रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याची वारंवार सूचना देऊन सुद्धा पाहिल्याच पावसात सदर रस्ता खड्डेमय झाला. त्यानंतर सतत पाठपुरावा करून सुद्धा केवळ खड्डे भरणे व थोड्याशा पावसात ते पुन्हा होणे असा प्रकार सुरूच आहे. या अगोदर सुद्धा प्रतीकात्मक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष् या गंभीर समस्येकडे वेधुन घेतले परंतु महापालिका प्रशासन जबाबदारी एक दुसर्‍याकडे ढकलत होते.
म्हणुन आज प्रिति सातम यांनी नागरिक प्रतिनिधींना सोबत घेऊन मलनिस्सारण सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देऊन 24 तासात तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली व जबाबदारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
प्रिती सातम यांचा रुद्रावतार पाहून सहाय्यक अभियंता यांनी तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या व ठेकेदारावर कारवाईचे आश्वासन दिले.
या वेळी प्रिती सातम यांच्या सोबत वॉर्ड अध्यक्ष नरेश सोनकांबळे,राजेश जी शर्मा, सुधीर जी तांबे, राकेश जी यादव, दामोदर जी लेले, दिनेश जी पुंडे,महेश जी पटेल,विनायक जी, अशोक जी मेहेर, गुंजाळ ताई, भास्कर तांबडे,सौरभ खुटवड, हे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button