भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या अथक प्रयत्नांना यश अंधेरी पश्चिम चित्रकूट ग्राउंड वरील आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर के पश्चिम विभागाचा बुलडोझर
अग्निशमन केंद्रासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण हटवले; गैराज आणि मंगल कार्यालय जमीनदोस्त अग्निशमन केंद्र होण्याकडे वाटचाल सुरू

भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर यांच्या अथक प्रयत्नांना यश अंधेरी पश्चिम चित्रकूट ग्राउंड वरील आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर के पश्चिम विभागाचा बुलडोझर

अग्निशमन केंद्रासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण हटवले; गैराज आणि मंगल कार्यालय जमीनदोस्त अग्निशमन केंद्र होण्याकडे वाटचाल सुरू
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवरील चित्रकूट मैदान परिसरात अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात मुंबई महानगरपालिकेच्या के-पश्चिम विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण करून उभारण्यात आलेले गैराज आणि मंगल कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. यासाठी भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर निवडणूक जिंकल्या पासून सातत्य पूर्ण प्रयत्न करत असून रूपेश सावरकर यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तत्कालीन आयुक्त भुषण गगराणी, यांची भेट घेतली तर के पश्चिम विभाग सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या सोबत स्थळ पाहणी दौरा देखील केला होता

अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आरक्षण असतानाही या जागेवर अनेक वर्षांपासून विविध व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. स्थानिक भाजप नगरसेवक रुपेश सावारकर यांनी निवडून आल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला होता.

अग्निशमन केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेवरच अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर के-पश्चिम विभागाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून गैराज आणि मंगल कार्यालयावर कारवाई केली.

दरम्यान, या कारवाईपूर्वी अग्निशमन केंद्रासाठी प्रस्तावित भूखंडाची पाहणी करण्यात आली होती. परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, यामुळे भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहोचणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

लिंक रोड व परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अधिक वेळ लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित भूखंड मोकळा करून तेथे केंद्र उभारण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या अग्निशमन केंद्राच्या प्रकल्पाला आता चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

