आमदार अमित साटम यांच्या हस्ते टाटा कॅम्पाउंड शाळेत गरजू विद्यार्थ्यांना झाले नोटबुक वाटप
अक्षय ज्ञानदेव गिऱ्हे तरुण युवक आहे आणि त्यांच्या काम अतिशय प्रामाणिक - आमदार अमित साटम

आमदार अमित साटम यांच्या हस्ते टाटा कॅम्पाउंड शाळेत गरजू विद्यार्थ्यांना झाले नोटबुक वाटप
अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात काल पुस्तक वाटपाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार श्री अमित साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आमदार अमित साटम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मेहनत आणि चिकाटीने जीवनात प्रगती करण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा महामंत्री ( sv road to juhu mandal ) उच्च शिक्षित तरुण अक्षय ज्ञानदेव गिऱ्हे तरुण युवक आहे आणि त्यांच्या काम अतिशय प्रामाणिक असून आलू वाडी परिसरातील नागरिकांना हक्काचे घर मिळाव व म्हणुन जय हिंद संकल्प सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) हिच्या माध्यामातून प्रयत्न करत आहे आणि मी आमदार म्हणुन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि अक्षय ज्ञानदेव गिऱ्हे याला लागेल ती आणि पाहिजे तिथे मदत करणार असल्याचे जाहीर पण सांगितले

या प्रसंगी एंजल लँड हायस्कूलची ९ वर्षीय विद्यार्थिनी आयेशा इब्राहिम शेख हिने स्वतःच्या हाताने तयार केलेले एक चार्ट पेपर आमदार श्री अमित सतम यांना सप्रेम दिले. या चार्टमध्ये गेल्या १२ वर्षांत अंधेरी पश्चिम विधानसभा – वार्ड १६५ मध्ये झालेल्या जलद विकासकामांचा उल्लेख करण्यात आला होता तर स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांचा देखील अमित साटम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी अक्षय ज्ञानदेव गिऱ्हे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत असेच चांगले काम भविष्यात देखील करत रहावे अश्या प्रतिक्रिया दिल्या
कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पालक उपस्थित होते आणि सर्वांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार अमित साटम यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.




