आपली मुंबईमहाराष्ट्रमुंबई
आंबोली निर्भया पथकाला माहिती मिळताच नाल्यात पडलेल्या गळ्या पर्यंत बुडालेल्या व्यक्तीची करण्यात आली सुखरूप सुटका

आंबोली निर्भया पथकाला माहिती मिळताच नाल्यात पडलेल्या व्यक्तीची करण्यात आली सुखरूप सुटका काल दिनांक 13/11/21 रोजी सकाळी 07.30 वाजता आंबोली मोबाईल 5, निर्भया पथक लक्ष्मी इंडस्ट्रीज, लिंक रोड जवळ निगराणी करत असताना लक्ष्मी इंडस्ट्रीजच्या मोठ्या नाल्यात एक व्यक्ती पडल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. लोकांकडून माहिती मिळताच निर्भया पथक तातडीने त्या व्यक्तीच्या मदतीला धावले.त्यावेळी सदरची व्यक्ती त्याच्या गळ्यापर्यंत बुडाली होता.

पो.उप.निरिक्षक बोराटे आणि निर्भया पथक यांनी तत्काळ के/पश्चिम नियंत्रण कक्ष यांना व अग्निशमन दल आणि रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक श्री. शेख यांना सदरची माहिती दिली. नितीन तुकाराम कासरे नावाचा व्यक्ती वय 34 वर्ष जोगेश्वरी पश्चिम येथील राहणार आनंदनगर येथील रहिवासी असून अंधेरी अग्निशमन दलाचे जवान व आंबोली वन मोबाईलच्या मदतीने नाल्यात पडलेल्या व्यक्तीला ज्याची मान पाण्यात बुडाली होती. त्याला नाल्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. नितीन तुकाराम कासरे नावाची व्यक्ती वय 34 वर्ष राहणार जोगेश्वरी पश्चिम आनंदनगर ही व्यक्ती पूर्णपणे स्वस्थ असुन, बीएमसी, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला नैसर्गिकरित्या बाहेर काढून त्याच्या घरी सोडण्यात आले.

घटनास्थळी पो.नि. शेख, सपोनि तिवारी, आंबोली वन मोबाईल उपस्थित होते.या बचाव मोहिमेचे नेतृत्व आंबोली पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्वर कामटे यांच्या नेतृतवाखालील करण्यात आला



