आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

*जनतेच्या प्रश्नाला न्याय – सुनिल जैन खाबिया यांच्या पाठपुराव्यामुळे भूखंडाभोवती भिंत*

प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून ठोस उपाययोजना केली, यासाठी आम्ही आभारी आहोत - सुनिल जैन खाबिया

*जनतेच्या प्रश्नाला न्याय – सुनिल जैन खाबिया यांच्या पाठपुराव्यामुळे भूखंडाभोवती भिंत*

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:false,”containsFTESticker”:false}
अंधेरी (प.) – जे.व्ही.पी.डी. स्कीम परिसरातील ए.व्ही.एम. शाळा व श्रीरामकृष्ण सोसायटी शेजारी असलेला रिकामा भूखंड अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत होता. या जागेवर विकृत, नशेडी आणि गर्दुल्ल्यांची वर्दळ वाढून खुलेपणाने मूत्रविसर्जन, कचरा टाकणे, तसेच असुरक्षित व त्रासदायक प्रकार सुरू होते. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायट्यांतील रहिवासी आणि ये जा करणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

या गंभीर समस्येकडे लक्ष देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल जैन खाबिया यांनी मागील वर्षी एस.व्ही.के.एम. प्रशासनाला पत्र देऊन ठोस कारवाईची मागणी केली होती. याआधी २०१४ मध्येही हा प्रश्न तत्कालीन शिवसेना खासदारांकडे मांडण्यात आला होता. त्यावेळी काही तात्पुरती कार्यवाही झाली होती, मात्र कायमस्वरूपी तोडगा निघाला नव्हता.

सदर भूखंडावर म्हाडाशी संबंधित वाद सुरु असल्याने दीर्घकाळ या प्रश्नाचे निराकरण होऊ शकले नाही. अखेर यंदाच्या जून महिन्यात वाद निकाली निघाल्यानंतर एस.व्ही.के.एम. प्रशासनाने पुढाकार घेत जागेभोवती मजबूत भिंत उभारली. या कारवाईमुळे गैरप्रकारांना आळा बसला असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. भूखंड रिकामा असताना येथे असुरक्षिततेची भीती निर्माण झाली होती. तर अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला होता. पण भिंत उभारल्यानंतर परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे.

“नागरिकांच्या तक्रारीकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून ठोस उपाययोजना केली, यासाठी आम्ही आभारी आहोत. सुनिल जैन खाबिया यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रश्न सुटला,” असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.

या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना खाबिया म्हणाले –
“हा विषय मला नागरिकांनी मांडला. हा प्रश्न केवळ अस्वच्छतेचा किंवा सुरक्षेचा नव्हता, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत होता. त्यामुळे मी लगेच एस.व्ही.के.एम. प्रशासनाला पत्र दिले आणि सतत पाठपुरावा केला. आज नागरिकांना दिलासा मिळाल्याचे समाधान आहे.”

या निर्णयाचे परिसरातील सर्व सोसायट्या, रहिवासी व प्रवाशांनी स्वागत केले असून, “हे काम खऱ्या अर्थाने जनतेसाठी केलेले कार्य आहे,” अशा शब्दांत स्थानिकांनी भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button