आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेष

लोखंडवाला परिसरात धुळीच्या प्रदूषणाचा त्रास; नागरिकांना श्वास घेणे कठीण!

के/पश्चिम विभागाकडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांची भूमिका बघ्याची

लोखंडवाला परिसरात धुळीच्या प्रदूषणाचा त्रास; नागरिकांना श्वास घेणे कठीण!

 

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील फर्स्ट क्रॉस लेनवर एका खासगी इमारतीच्या पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लोखंडवाला ओशिवरा सिटिझन्स असोसिएशन (LOCA) यांनी या समस्येकडे लक्ष वेधत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागाकडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (MPCB) तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

 

पाडकामादरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे रहिवासी आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनासंबंधी त्रास असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

पाडकामाच्या ठिकाणी नियमित पाण्याची फवारणी करावी, धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात आणि पर्यावरणविषयक नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

विकासकामांना विरोध नसून, ती कामे नागरिकांच्या आरोग्याला बाधा न आणता आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करून व्हावीत, अशी भूमिका असोसिएशनने मांडली आहे.

 

आता या तक्रारीची दखल घेऊन महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

महाराष्ट्र News 9 — जनतेचा आवाज, जनतेची बातमी!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button