आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

तुंगा गावातील शिवशक्ती नगर येथे प्रधानमंत्री जन औषधी केंद्रचे उद्घाटन संपन्न

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन

मुंबई: तुंगा गावातील शिवशक्ती नगर येथे प्रधानमंत्री जन औषधी केंद्रचे उद्घाटन संपन्न झाले. या जन औषधी केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या करकमलांनी करण्यात आले.

उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी दिलीप माटेकर, नरेंद्र उपाध्याय, सुरेंद्र सिंह (झिंटू), अश्विनी साहू, महाजन कदम, नितीन, सचिन धुरी, सुभाष, उषा पवार, पत्रकार मनोजकुमार यादव, हरेश गुजेटी, मुकेश पंचोली, राजहंस मौर्या, अमर काकडे तसेच सोशल एज्युकेशनल वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष सगीर अन्सारी यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते. पवई विकास समिती आणि कोकण सेवा संघाच्या टीमनेही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. सुनील पंचोली यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला संबोधित करताना अनिल गलगली म्हणाले की, प्रधानमंत्री जन औषधी केंद्र ही सामान्य नागरिकांना परवडणारी व दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणारी महत्त्वाची योजना असून, याचा विशेषतः गरीब व मध्यमवर्गीयांना मोठा लाभ होणार आहे. उद्घाटन समारंभ सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत परिसरासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button