आमची मुंबईमहाराष्ट्रविशेषसंपादकीयसामाजिक

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सदिच्छा भेट; संघटनात्मक बळकटी आणि मुंबई विकासावर सखोल चर्चा

आमदार अमीत साटम यांनी युवकांसाठी प्रेरणादायी असलेले व स्वतः लिहलेले ‘उडान’ या पुस्तकाची प्रत अमित शाह यांना दिली भेट

📰 मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सदिच्छा भेट; संघटनात्मक बळकटी आणि मुंबई विकासावर सखोल चर्चा

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अलीकडेच सदिच्छा भेट घेतली. ही भेट केवळ औपचारिक न राहता संघटनात्मक बळकटी, पक्षाची वाटचाल आणि मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीबाबत, पक्षाच्या विस्तारासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत आणि आगामी काळातील रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील, यावर अमित शाह यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अमित साटम यांनी पक्षाच्या वाटचालीदरम्यान मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल गृहमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्नेहपूर्ण वातावरणात त्यांनी स्वतः लिखित ‘उडान’ या प्रेरणादायी पुस्तकाची प्रत अमित शाह यांना भेट दिली. युवकांना प्रेरणा देणारे हे पुस्तक समाजातील तरुणांना नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भेटीदरम्यान मुंबईच्या सर्वांगीण विकासावरही विस्तृत चर्चा झाली. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना अधिक चांगल्या सेवा कशा देता येतील, यावर विशेष भर देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबईचा विकास अधिक वेगाने कसा साधता येईल, याबाबतही मार्गदर्शन घेण्यात आले.

 

या भेटीमुळे मुंबई भाजपाच्या संघटनात्मक कार्याला नवचैतन्य मिळणार असून आगामी काळात पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

#BJPParivar #AmitShah #BJP #AmeetSatamWithMumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button