आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

प्राचार्य अजय कौल यांच्या पुढाकारातून ‘माय वर्सोवा, माय प्राइड’ संवादाला दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुटणार तक्रारी

प्राचार्य अजय कौल सर यांनी खासदार रविंद्र वायकर, आमदार हारून खान, प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांना आणले एका मंचावर

प्राचार्य अजय कौल यांच्या पुढाकारातून ‘माय वर्सोवा, माय प्राइड’ संवादाला दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुटणार तक्रारी

प्राचार्य अजय कौल सर यांनी खासदार रविंद्र वायकर, आमदार हारून खान, प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांना आणले एका मंचावर

मुंबई : वर्सोवा परिसरातील नागरिकांच्या स्थानिक समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवून त्यांच्या निराकरणासाठी संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘माय वर्सोवा, माय प्राइड’ या संवाद कार्यक्रमात प्राचार्य अजय कौल यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली. शिक्षण क्षेत्रातील अनुभवाच्या बळावर नागरिकांच्या समस्या आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न झाला .  अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमातून नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परिसरातील प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता ते संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जावा, हा या संवादामागील प्रमुख उद्देश होता. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू ठरला.

नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचा पुढाकार

प्राचार्य अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात खासदार रवींद्र वायकर, आमदार हारून खान यांच्यासह विविध स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले.

नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडता यावेत, त्यांचे म्हणणे लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावे आणि स्थानिक समस्यांवर सामूहिकरीत्या मार्ग शोधता यावा, यासाठी या संवाद कार्यक्रमाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

 

शिक्षण संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन

शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाजाशी जोडलेले महत्त्वाचे केंद्रही असू शकते, हा विचार अशा उपक्रमांतून पुढे येतो. प्राचार्य अजय कौल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाने शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांवर संवाद घडवून आणण्याची संधी निर्माण केली.  यावेळ.खासदार रविंद्र वायकर, आमदार हारून खान, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड, नगरसेवक शैलेश फणसे, सायली कुलकर्णी, दिव्या सिंह, जिशान मुलतानी, सबाह हारून खान यावेळी  एका मंचावर आले.

या उपक्रमामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधण्यास मदत झाली. आता या बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी कोणती कार्यवाही करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘माय वर्सोवा, माय प्राइड’ हा उपक्रम नागरिकांचा आवाज लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाचे उदाहरण ठरला असून, या संवादाच्या आयोजनात प्राचार्य अजय कौल यांचे नेतृत्व केंद्रस्थानी राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button