विकास नगरच्या विकासाला सुरुवात! भाजपा रुपेश सावरकर यांच्या पुढाकारातून ड्रेनेज कामाचा शुभारंभ
रुपेश सावरकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे दर्शन घेऊन सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

मुंबई : विकास नगर परिसरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विकास नगर जनसेवा समितीच्या वतीने ड्रेनेजसाठी आरसीसी (RCC) मॅनहोल कव्हर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामाची सुरुवात स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या प्रसंगी रुपेश सावरकर उपस्थित होते.

परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने या कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून या कामाचा शुभारंभ झाल्याने परिसराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे दर्शन
दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त भाजपा नगरसेवक रुपेश सावरकर यांनी परिसरातील स्थानिक मंदिरांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास नगरच्या नागरी समस्यांवर उपाययोजना करून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दिशेने हे काम महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात विकास नगरमध्ये आणखी कोणती विकासकामे मार्गी लागतात, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


