मारवाडी युवा मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
अखिल भारतीय मारवाडी युवा मंच चे राष्ट्रीय मिडिया अँड टेक्नोलॉजी चेअरमन सुनिल जैन खाबिया यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन
🎙️ मारवाडी युवा मंचाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! एका रक्तदात्याने केलेले रक्तदान एखाद्या गरजू रुग्णाला जीवनदान देऊ शकते. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मारवाडी युवा मंच, मुंबई शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आरव्हीजी एज्युकेशन कॅम्पस परिसरात हे रक्तदान शिबिर पार पडले. सकाळी १० वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय मारवाडी युवा मंच चे राष्ट्रीय मिडिया अँड टेक्नोलॉजी चेअरमन सुनिल जैन खाबिया यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रक्तदानाबाबत जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांसाठी रक्ताचा पुरवठा उपलब्ध होण्यास हातभार लावणे हा होता.

‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ हा संदेश देत मारवाडी युवा मंचाने समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी अधोरेखित केली. रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी जसलोक हॉस्पिटलने ब्लड बँक पार्टनर म्हणून सहकार्य केले.

मारवाडी युवा मंचाचे मुंबई अध्यक्ष सीए कपिल करनावत, महामंत्री तथा सचिव सीए प्रशांत घोरेला आणि कोषाध्यक्ष सीए हार्दिक लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.
समाजसेवा, मानवता आणि जनकल्याण या मूल्यांना प्राधान्य देत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा मंचाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यास हातभार लागतो. त्यामुळे निरोगी आणि पात्र नागरिकांनी नियमित रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
‘रक्ताची एक बूँद, जीवनाची नवी उम्मीद!’

याच प्रेरणादायी संदेशासह मारवाडी युवा मंचाच्या या रक्तदान शिबिराने सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा आदर्श समाजासमोर ठेवला. यावेळी रक्तदान्य करणाऱ्या रक्तदात्यांनी आपली प्रतिक्रिया दिली तर सुनिल जैन खाबिया, कपिल करणावत , अमीत मलावत यांनी आपली प्रतिक्रिया दिली

