आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन बदली प्रणाली लागू; 694 अभियंत्यांचा समावेश

RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पारदर्शक बदली प्रक्रियेचा मार्ग मोकळा

मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन बदली प्रणाली लागू; 694 अभियंत्यांचा समावेश

 

RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे पारदर्शक बदली प्रक्रियेचा मार्ग मोकळा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) इतिहासात प्रथमच अभियंत्यांच्या विविध संवर्गांसाठी ऑनलाइन बदली प्रणाली लागू करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि प्रशासकीय उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश मिळाले आहे.

 

या ऑनलाइन बदली प्रक्रियेत एकूण 694 अभियंत्यांचा समावेश असून संवर्गनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

1. SE (M&E) – 99

2. AE (M&E) – 55

3. JE (Civil) – 120

4. JE (M&E) – 31

5. AE (Civil) – 44

6. SE (Civil) – 345

 

एकूण – 694 अधिकारी

 

या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहे. बदली प्रक्रियेत होणारा राजकीय हस्तक्षेप रोखण्याबाबत त्यांनी घेतलेली ठाम भूमिका आणि दिलेला भक्कम पाठिंबा यामुळे पारदर्शक व निष्पक्ष प्रणाली राबविण्यास बळ मिळाले.

 

तसेच, ही प्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी सकारात्मक भूमिका आणि इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि प्रमुख अभियंता रामचंद्र कदम यांचेही विशेष आभार.

 

RTI कार्यकर्ता अनिल गलगली यांनी बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाचा पाठिंबा आणि महापालिका प्रशासनाची सकारात्मक भूमिका यांची सांगड घातल्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल प्रत्यक्षात येऊ शकला.

 

महापालिकेच्या बदली प्रक्रियेत मनमानी आणि राजकीय हस्तक्षेपाला आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष व आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने ऑनलाइन बदली प्रणाली हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे गलगली यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button