आपली मुंबईआमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबई

विकास सूर्यकांत केदारे (वय 34) या युवकाने आपल्या आर्या या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह राहत्या घरी केली आत्महत्या

सुसाईड नोट मध्ये पोलीस अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप

कसारा – आसनगावमध्ये राहणाऱ्या विकास सूर्यकांत केदारे (वय 34) या युवकाने आपल्या आर्या या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह राहत्या घरी मंगळवारी 16 तारखेला आत्महत्या केली.पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहलेल्या पत्रात पोलीस, समाज व्यवस्था यावर गंभीर भाष्य केले आहेत. या घटनेमुळे आसनगांव परिसरासह पूर्ण शहापुर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.


विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. विकास आणि त्याची वयोवृद्ध आई अशा दोघांनीही या आरोपाखाली काही महिने जेलमध्ये काढले होते. ती घटना सहन करण्याच्या पलीकडची होती, असं उद्विग्न होऊन नमूद करत विकासने नैराश्यातून मुली सह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने लिहलेल्या दोन पाणी सुसाईड नोट सुरुवात अत्यंत भावनिक असून यात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्या सुसाईड नोटच्या आधारे शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आज १५ मार्च २०२२, जवळपास ७ महिने झालेत. मोनाली गेली. ती गेली पण मागे खूप सारे प्रश्न सोडून गेली. ७ महिन्यामध्ये मी रोज माझं मरण पाहिलं आहे. खूप त्रास होत आहे.

कदाचित कुणीच समजू शकणार नाहीत.कुणाच्या तरी सांगण्यावरून तक्रार झाली.त्यानंतर मी कसं आयुष्य भोगले ते फक्त मीच सांगू शकतो. आर्याकडे पाहून पुन्हा उभं रहायचा खूप प्रयत्न केला, पण आता खूप असह्य होत आहे. मी आणि आर्या आम्ही दोघेही आत्महत्या करीत आहोत. अशी सुरवात सुसाईड नोट मध्ये केली असून या सुसाईड नोट मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा नावाचा देखील उल्लेख  करण्यात आला आहे. 


 मृत विकासाच्या नातेवाईकांनी शहापूरचे डीवायएसपी नवनाथ ढवळे यांची भेट घेऊन बाप लेकीच्या आत्महत्येसह कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी लेखी तक्रार दिली आहे. तर बाप लेकीच्या आत्महत्येच्या मागचे नक्की कारण काय, याबाबतचा शहापूर पोलीस तपास करत असल्याची माहिती डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button