आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबई

उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवार रविंद्र वायकर काठावर पास तर आमदाराचे वाढले टेंशन 

उत्तर पश्चिम लोकसभा उमेदवार रविंद्र वायकर काठावर पास तर आमदाराचे वाढले टेंशन 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आणि भाजपच्या आमदारांचे टेन्शन वाढवणारा निकाल

गोरेगाव विधानसभा आमदार विद्या ठाकूर ठरल्या विजयाच्या खऱ्या मानकरी  विद्या ठाकूर यांचा रविंद्र वायकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा

अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम यांना आपले मतदान राखण्यात यश तर महाविकास आघाडी एकत्र आल्याने अमोल किर्तीकर यांना झाला मतांचा फायदा 

मुंबई: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणूक देशात चर्चेचा विषय झाली आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या झालेल्या लढतीत शिंदे सेनेचे रवींद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय झाला असला तरी वायकर ज्या जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून मागील तीन वेळा आमदार असलेले  रविंद्र वायकर यांना स्वतःच्या मतदारसंघात त्यांना लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळवता आली नाही हे दुर्दैव. महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना वायकरांच्या विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी मिळालेली पाहायला मिळाली.

उत्तर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यात गोरेगाव मध्ये विद्या ठाकूर, वर्सोवा विधानसभा मध्ये डॉ भारती लव्हेकर तर अंधेरी पश्चिम विधानसभा मध्ये अमीत साटम हे तीन भाजपचे आमदार आहेत. तर दिंडोशी मध्ये सुनिल प्रभु आणि अंधेरी पूर्व मतदारसंघात ऋतूजा लटके हे उद्धव सेनेचे आमदार असून जोगेश्वरी पूर्व या  मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवणारे स्वतः रविंद्र वायकर आमदार आहेत.

कोणत्या विधानसभेत कोणाच्या आमदाराच्या मतदारसंघात कोणाला मिळाली किती मते ? मुंबई उत्तर पश्चिम मधील मतदार संघ व आमदार खालील प्रमाणे

रवींद्र वायकर आमदार असलेल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातच त्यांना स्वतःला लोकसभा निवडणुकीत आघाडी घेता आली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्वमध्ये ९०,६५४ मते घेऊन वायकर जिंकले होते. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना या विधानसभा मतदारसंघात ७२,११८ मते मिळाली आहेत. तर उद्धव सेनेच्या ठाकरे यांना ८३,४०९ मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी ऑक्टोबर महिन्यात होनारी विधानसभा निवडणूक शिंदे सेनेसाठी इथून अवघड जाणार अशी चिन्हे  दिसत आहेत.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरल्या असुन गोरेगाव विधानसभा आमदार विद्या ठाकूर ठरल्या विजयाच्या खऱ्या मानकरी असल्याचे दिसून आले विद्या ठाकूर यांचा रविंद्र वायकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा दिसून आला कारण गोरेगाव विधानसभा आमदार विद्या ठाकूर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८१,२३३ मते मिळाली होती. त्यांच्या मतदारसंघात रवींद्र वायकरांना ९४,३०४ मते मिळाली आहेत. तर कीर्तिकर यांना ७०,५६२ मते मिळाली आणि रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला. लोकसभेची इथली आघाडी लक्षात घेता ऑक्टोंबर मधली विधानसभा निवडणुक भाजपा साठी सोपी असेल असे दिसते

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी जोगेश्वरी पूर्वसह दिंडोशी आणि वर्सोवा या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेतली आहे. वर्सोवा मतदारसंघात अमोल कीर्तिकरांना मिळालेली आघाडी लक्षवेधक आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वर्सोवातून भाजपच्या भारती लवेकर ४१,०५७ मते घेऊन विजयी झाल्या होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभेत इथे अमोल कीर्तिकरांना ८०,४८७ मते मिळाली आहे. तर रविंद्र वायकरांना ५९,३९७ मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत वर्सोवा मतदारसंघातील लढत कठीण असल्याचे आताच चिन्हे आहेत

उद्धव सेनेकडे असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघात मात्र शिंदे सेनेच्या • वायकरांनी आघाडी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इथून रमेश लटके यांनी ६२,७७३ मते घेऊन विजय मिळवला होता. त्यांच्या निधनानंतर इथे नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ६६,६१८ मते घेऊन विजयी झाल्या होत्या. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात वायकरांना ७८,७६४ मते तर कीर्तिकरांना ६८,६४६ मते मिळाली आहेत. इथून वायकरांना १०,११८ मतांची आघाडी मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ ● आमदार अमीत साटम . अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम यांना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ६५,६१५ मते मिळाली होती. तर या लोकसभा निवडणुकीत अंधेरी पश्चिम विधानसभा मधून रविंद्र वायकर यांना ७०,७४३ मते मिळाली आहेत. तर अमोल कीर्तिकर यांना ७०,५२२ मते मिळाली आहेत. रविंद्र वायकरांना अमीत साटम यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अवधी २२१ मतांची निसटती आघाडी मिळाली आहेत. त्यामुळे आघाडी मिळाली असली तरी देखील विधानसभा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपला मेहनत करावी लागणार असल्याचे निदर्शनास येत आहे

दिंडोधी विधानसभा मतदारसंघ मध्ये आमदार असलेले सुनिल प्रभु यांचा मतदार संघात रविंद्र वायकर यांना ७५७६८ मते मिळाली तर अमोल किर्तीकर यांनी ७७४६९ मते मिळवून १७०० मतांची निर्णायक आघाडी मिळवून दिली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही आघाडी विजयासाठी पुरेशी ठरेल असे वाटत नाही त्यामुळे दिंडोशी मध्ये देखिल अटी तटीची लढल पाहायला मिळू शकेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button