आमची मुंबईमहाराष्ट्रराजकीय बातमीविशेष

प्रविण मर्गज व बाबूभाई पिल्ले यांच्या पक्ष प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला आज मनसेला करणार अखेरचा जय महाराष्ट्र

प्रविण मर्गज व बाबूभाई पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे 700 पेक्षा जास्त महाराष्ट्र सैनिक करणार जनता पार्टी मधील जाहिर पक्ष प्रवेश!"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेतृत्व म्हणुन ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व विधानसभाचे माजी विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले यांना विभाग अध्यक्ष पदावरून हटवून त्या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक चे प्रशिक्षक संदीप ढवळे यांची विभाग अध्यक्ष पदावर नियुक्ती केल्या नंतर जोगेश्वरी पूर्व मध्ये मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये मोठी नाराजगी निर्माण झाली होती. त्यावेळी बाबूभाई पिल्ले यांना पदावरून हटवले म्हणुन नाराजगी व्यक्त केलेल्या प्रविण मर्गज यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कोणताही संबंध राहणार नाही पत्रक 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

याचं सर्व घडामोडी नंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनसेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण मर्गज व जोगेश्वरी पूर्व विधानसभा माजी विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले उद्या मनसेला जय महाराष्ट्र करणार असुन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत त्या निमित्ताने त्यांनी मनसे चे महाराष्ट्र सैनिक यांना एक संदेश पाठवला आहे त्यात त्यांनी असे सांगितले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझे सहकारी बंधु-भगिनींनो आपल्या सोबत समाजकार्य करत जोगेश्वरी च्या सर्वांगीण विकासा साठी प्रयत्न करत असताना आपली सदैव साथ लाभली.त्यामुळेच जोगेश्वरी पूर्व विधानसभेत आज पर्यंत आपण चांगल काम करु शकलो. राजसाहेब सोबत गेली ३०वर्षे एकनिष्ठ पणे काम करत असताना साहेबाचा आदेश मानत पक्षाच्या आंदोलनात आक्रमकपणे भाग घेऊन प्रसंगी अंगावर अनेक केसेस घेऊन कारावास भोगला, पण पक्ष हितासाठी कुठे कमी पडलो नाही.पक्षाच्या वाढीसाठी १८ वर्ष पक्षांची ध्येय धोरणे राबवण्यासाठी अनेक रचनात्मक कार्यक्रम जोगेश्वरी विधानसभा सभेत राबविले. दिवस रात्र कार्यरत राहुन पक्षांचे संघटन वाढावे म्हणून आक्रमक पणे कार्यरत राहीलो.


पण पक्षांमध्ये काही लोकांच्या स्वार्थ हस्तक्षेपा मुळे माझ्यासारखा कर्मठ निष्ठावान कार्यकर्ता पक्षाच्या बाहेर फेकला गेलो. हे अस किती वेळा व्हावे, म्हणून आपणच नाईलाजास्तव वेगळा मार्ग अवलंबावा अस मला वाटत. हिदूंजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे माझ्यासाठी सदैव आदरणीय आहेत व आयुष्याभर होते व पुढेही राहातील.

खरं तर हा निर्णय नाईलाजास्तव हृदयावर दगड ठेवून घ्यावा लागत आहे. म्हणून मी व माझे सहकारी आपणास आमंत्रित करीत आहोत, पुढे ढकलण्यात आलेला भारतीय जनता पक्षातील जाहिर प्रवेश रविवार दि.०७/०४/२०२४रोजी. सायं.५.३०वा. भा ज पा मुंबई अध्यक्ष आमदार मा.आशिष शेलार व विधान परिषद गटनेते(भाजपा) आमदार प्रविणभाऊ दरेकर,भाजपा लोकसभा अध्यक्ष संतोष मेढेकर ,निवडणूक प्रमुख जोगेश्वरी-पूर्व विधानसभा माजी नगरसेविका उज्वला मोडक यांच्या उपस्थितीत होत आहे.

स्थळ: राम मंदिर सभागृह,पश्चिम दृतगती महामार्गा जवळ,जोगेश्वरी (पूर्व) तरी तेथे उपस्थित राहून साथ निभवावी , हि नम्र विनंती.धन्यवाद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button