आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्र

भाजपच्या मुरजी पटेल यांना बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण भोवल कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल

मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात केला गुन्हा दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र वापरल्याचा ठपका ठेवत कोर्टाने भाजपचे नेते मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे

भाजप नेते मुरजी पटेल यांनी २०१७ साली अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र वापरले असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, मुरजी पडेल यांनी निवडणुकीत जातीचे बोगस प्रमाणपत्र वापरले कोर्टात सिद्ध झाले. इतकंच नाही तर, मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दिले होते, ते देखील बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.

त्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना दिले. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे

मुरजी पटेल हे भाजपचे मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा सरचिटणीस म्हनून कार्यरत आहेत. त्यांनी २०१७ साली त्यांनी अंधेरीतून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्यामुळे ६ सहा वर्षांसाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आक्षेप घेतल्याने हा अर्ज मागे घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button