आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमीविशेषसामाजिक

जगदीश शर्मा यांची भाजप उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती; जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून भाजपच्या उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदापर्यंत जगदीश शर्मा यांचा राजकीय प्रवास

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून सुरू झालेला जगदीश शर्मा यांचा राजकीय प्रवास आता देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला आहे. पक्ष संघटनेत सातत्याने केलेले कार्य, निष्ठा आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या जगदीश शर्मा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर कार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांची उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

नियुक्तीनंतर जगदीश शर्मा यांनी पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी विशेषतः मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, नगरसेवक रुपेश सावरकर तसेच वर्सोवा विधानसभा समर्थ नगर मंडल अध्यक्ष विजय पाठक यांचे विशेष आभार व्यक्त केले.

“पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणी आणि संघटनेच्या अपेक्षांवर खरे उतरून समर्पण, निष्ठा आणि मेहनतीच्या बळावर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी सातत्याने कार्य करत राहीन,” असे जगदीश शर्मा यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button