छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला रेल्वे रुळांवर ढकलले; मुंबईत संतापजनक घटना, २० वर्षीय तरुणीचा डावा हात गमावला!
लोकल ट्रेनमध्ये छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला रेल्वे रुळांवर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार

🔴 छेडछाडीला विरोध केला म्हणून तरुणीला रेल्वे रुळांवर ढकलले; मुंबईत संतापजनक घटना, २० वर्षीय तरुणीचा डावा हात गमावला!
मुंबई : लोकल ट्रेनमध्ये छेडछाडीला विरोध करणाऱ्या २० वर्षीय तरुणीला रेल्वे रुळांवर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार नायगाव रेल्वे स्थानकात घडला आहे. या घटनेत तरुणीला आपला डावा हात गमवावा लागला असून भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी जितेंद्र गिर्जप्पा हिरमुखे (५३) याला अटक केली आहे.
४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी संबंधित तरुणी बोरिवलीहून विरारच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. प्रचंड गर्दीमुळे ती चुकून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढली. प्रवासादरम्यान आरोपीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या गैरवर्तनाला तिने तीव्र विरोध केला.
सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता नायगाव स्थानकात दोघांमध्ये वाद झाला. तरुणीने छेडछाडीबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने तिला धक्का दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे ती रेल्वेच्या दोन डब्यांमधील फटीतून रुळांवर पडली. पुन्हा फलाटावर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाली आणि तिचा डावा हात चाकाखाली सापडला. गंभीर दुखापतीमुळे कोपराखालील हात गमवावा लागला. तिच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.
जखमी तरुणीला सुरुवातीला वसईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात हलवण्यात आले.
सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे समजले जात होते. मात्र ६ नोव्हेंबर रोजी तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबातून छेडछाड आणि धक्काबुक्कीचा आरोप समोर आला. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला.
९ नोव्हेंबर रोजी जितेंद्र हिरमुखे याला अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर हत्येच्या प्रयत्नाचे कलम १०९ देखील जोडण्यात आले आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Mumbai Local Train News, Naigaon Railway Station Incident, Jitendra Hirmukhe Arrest, Mumbai Woman Safety, Railway Molestation Case, Bhayandar Railway Police, Maharashtra Crime News, Women Safety India, Mumbai Breaking News, Maharashtranews9
#MumbaiLocal #NaigaonStation #Police #WomenSafety #MaharashtraNews9
Pim


