दिवाळीनिमित्त उद्धवसाहेब ठाकरे यांची सुनील जैन खाबिया यांनी घेतली सदिच्छा भेट; अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्याशीही साधला संवाद!
उद्धवसाहेबांच्या भेटीतून मिळाली नवी ऊर्जा अन् प्रेरणा! अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी व्यक्त केली भावना

मुंबई | प्रतिनिधी – दिवाळी सणाच्या मंगलमय पर्वानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

या सदिच्छा भेटीसोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख तथा आमदार ॲड. अनिल परब आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांचीही सुनील जैन खाबिया यांनी भेट घेतली. यावेळी दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करत स्नेहपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला.

या भेटीबाबत भावना व्यक्त करताना सुनील जैन खाबिया यांनी सांगितले की, उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट नेहमीच नवी ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारी ठरते. साहेबांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद यापुढेही असेच लाभत राहोत, हीच मनापासून सदिच्छा आहे.
दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीतून पक्षातील ज्येष्ठ नेतृत्वाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि स्नेहभाव पुन्हा अधोरेखित झाला. राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शनासोबतच नेतृत्वाचे आशीर्वाद आणि प्रेरणा कार्यकर्त्यांना नवी उमेद देतात, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.


