दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक रूपेश सावरकर यांनी घेतली सदिच्छा भेट; वॉर्ड ६३ मधील विकासकामांवरही चर्चा!
लोखंडवाला येथील रुणवाल इमारतीला लागलेल्या आगीमुळे चित्रकूट ग्राउंड वरील अग्निशमन केंद्र पुन्हा एकदा चर्चेत

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगरसेवक रूपेश सावरकर यांनी घेतली सदिच्छा भेट; वॉर्ड ६३ मधील विकासकामांवरही चर्चा!
मुंबई : दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा सावरकर फाऊंडेशनचे अध्यक्ष रूपेश गजानन सावरकर यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे आशीर्वाद घेतले.

या सदिच्छा भेटीदरम्यान वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक ६३ मधील विविध नागरी प्रश्न, प्रलंबित समस्या आणि विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या सार्वजनिक सुविधांसह विविध विकासविषयक बाबींकडे लक्ष वेधण्यात आले.
नगरसेवक रुपेश सावरकर यांनी पदभार घेतल्यापासून अंधेरी पश्चिम लिंक रोड येथील अग्निशमन केंद्रची मागणी लावून धरली होती. दिवाळी वेळी लोखंडवाला येथील रुणवाल इमारतीला लागलेल्या आगीमुळे चित्रकूट ग्राउंड वरील अग्निशमन केंद्र वर पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे अग्निशमन केंद्रची मागणी केली.

स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि परिसराच्या विकासाच्या गरजा लक्षात घेऊन वॉर्ड क्रमांक ६३ मधील प्रश्न शासनस्तरावर मांडण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला. नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात आणि परिसरातील विकासकामांना गती मिळावी, हा या चर्चेमागील उद्देश असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी रूपेश सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रकाशाचा हा मंगल सण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीचा दीप सदैव असाच तेवत राहो आणि राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
दिवाळीच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि वॉर्ड क्रमांक ६३ च्या विकासासंदर्भातील चर्चेच्या निमित्ताने झालेली ही भेट स्थानिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. आता या चर्चेतून वॉर्ड क्रमांक ६३ मधील विविध नागरी प्रश्नांना कितपत गती मिळते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
— महाराष्ट्र News 9

