आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर MPSC पात्र उमेदवाराची नियुक्ती करा!

लिफ्ट दुरुस्ती, नवीन लिफ्ट आणि रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्थेबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे तीन पानी निवेदन

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर MPSC पात्र उमेदवाराची नियुक्ती करा!

 

लिफ्ट दुरुस्ती, नवीन लिफ्ट आणि रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्थेबाबत अनिल गलगली यांचे तीन पानी निवेदन

केईएम रुग्णालयातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रुग्ण, दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांची भेट घेऊन तीन पानी सविस्तर निवेदन सादर केले. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता (Dean) पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पात्रता प्राप्त केलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी गलगली यांनी निवेदनातून केली आहे.

 

या निवेदनात केईएम रुग्णालयातील लिफ्ट दुरुस्तीचे काम, नवीन लिफ्ट बसविण्याची प्रक्रिया तसेच लिफ्ट बंद असताना रुग्णांसाठी करावयाच्या पर्यायी व्यवस्थांबाबत सविस्तर मुद्दे मांडण्यात आले आहेत. विशेषतः अपंग, फ्रॅक्चरग्रस्त आणि गंभीर रुग्णांना जिन्यांचा वापर करणे शक्य नसल्याने त्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरापासून अनिल गलगली हे केईएम रुग्णालयातील लिफ्ट दुरुस्ती आणि नवीन लिफ्ट बसविण्याच्या विषयावर सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी हा विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अध्यक्षांसमोर मांडला.

 

रुग्णालयाचा प्रशासकीय कारभार अधिक पारदर्शक आणि जबाबदार राहण्यासाठी अधिष्ठाता पदावर MPSC पात्र उमेदवाराची नियुक्ती करावी. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, स्वच्छता, लिफ्ट व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे. कारण सद्या प्रभारी अधिष्ठाता आहेत जे प्रशासकीय कामकाज हाताळण्यात सक्षम नाही.

 

रुग्णांना सुरक्षित आणि सुलभ वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, लिफ्टच्या समस्येमुळे कोणत्याही रुग्णाच्या उपचारात अडथळा निर्माण होता कामा नये, अशी भूमिका अनिल गलगली यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button