माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘Lal Ded Literary Award 2026’ पुरस्काराने गौरव!
मुंबई मराठी पत्रकार संघात साहित्याचा सन्मान! अनिल गलगली यांना ‘2nd Lal Ded Literary Award 2026’ प्रदान

मुंबई : माहिती अधिकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ‘Afternoon Voice’ तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘2nd Lal Ded Literary Award 2026’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनिल गलगली यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याच कार्यक्रमात डॉ. वैदेही तामण लिखित ‘लल देद : काश्मीरची आई’ या पुस्तकाचे प्रकाशनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. काश्मीरच्या संत कवयित्री लल देद यांच्या जीवनकार्यावर आधारित या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमाला साहित्यिक महत्त्व प्राप्त झाले.
या सोहळ्याला माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची विशेष उपस्थिती होती. साहित्य, सामाजिक कार्य आणि माहिती अधिकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात अनिल गलगली यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



