आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एकता मंच’चे आवाहन; प्राचार्य अजय कौल यांनी नागरिकांना मानवतेचा हात पुढे करण्याचे केले आवाहन

"चला, मानवतेचा हात पुढे करूया आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण करूया."- प्राचार्य अजय कौल

 

आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एकता मंच’चे आवाहन; प्राचार्य अजय कौल यांनी नागरिकांना मानवतेचा हात पुढे करण्याचे केले आवाहन

मुंबई | प्रतिनिधी आसाम राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या संकटग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी एकता मंचने मदत संकलन अभियान सुरू केले असून समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

एकता मंचचे अध्यक्ष प्राचार्य अजय कौल यांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे, चादरी, पिण्याचे पाणी, स्वच्छता साहित्य, औषधे तसेच आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. अशा कठीण काळात समाजाने एकजुटीने पुढे येऊन मानवतेचे कर्तव्य पार पाडावे, असे त्यांनी नमूद केले.

 

या मदत अभियानांतर्गत ४ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मदत संकलित करण्यात येणार आहे. मदत केंद्र चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००६१ येथे ठेवण्यात आले आहे.

 

ज्यांना आर्थिक मदत करायची आहे, त्यांच्यासाठी बँक खात्याची तसेच QR कोडद्वारे ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी करण सेठी – ९८३३११२३८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्राचार्य अजय कौल यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत म्हटले आहे की, “चला, मानवतेचा हात पुढे करूया आणि आसाममधील पूरग्रस्तांच्या जीवनात पुन्हा आशेचा किरण निर्माण करूया.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button