आमची मुंबईगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेष

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागातील जलविभागात ACBचा मोठा सापळा! ४० हजारांची लाच घेताना जलमापक पर्यवेक्षक रंगेहाथ; निरीक्षक झाला फरार

मुंबई महानगर पालिका मधील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागातील जलविभागात ACBचा मोठा सापळा! ४० हजारांची लाच घेताना जलमापक पर्यवेक्षक रंगेहाथ; निरीक्षक झाला फरार

मुंबई | प्रतिनिधी – अंधेरी पश्चिम मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागातील जलविभागात पाणी मीटर व पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी लाच मागितल्याच्या गंभीर प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी (दि. २९ जुलै) धडक कारवाई करत जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

जलविभागात पाणी मीटर व पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी एक लाख  २० हजाराची लाच मागण्यात आल्याचा आरोप असून तडजोडी नंतर ८० हजार रुपय रुपये ठरले . त्यातील ५० टक्के रक्कम काम सुरू करण्याआधी  अंधेरी पश्चिम येथील sv रोड वरील टॉप 10 मोबाईल शॉप समोर जलमापक पर्यवेक्षक विनोद भगवान राठोड याला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक  करणात आली असून निरीक्षक नंदन बाळकृष्ण मोरे याचाही सहभाग समोर आला असून तो फरार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा शोध सुरू असून ACBकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

 

तक्रारदाराकडून पाणी मीटर व पुनर्नळ जोडणीच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

या कारवाईमुळे मुंबई महापालिकेच्या जलविभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून जलसंबंधित कामांसाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारींना या कारवाईमुळे दुजोरा मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

 

ACBने या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईनंतर पालिकेतील इतर विभागांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button