आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिकसामाजिक

१००% निकाल देणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव; मुंबई विभागाचा विशेष सन्मान सोहळा २४ जुलैला

प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अजय कौल सर राहणार उपस्थित संघटनेने दिले निमंत्रण

 

१००% निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा होणार गौरव; प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण

 

महाराष्ट्र न्यूज 9 टीम-| प्रतिनिधी – बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना, मुंबई विभागाच्या वतीने सन २०२५–२६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक निकाल प्राप्त केलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

 

या समारंभासाठी चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर, वर्सोवा, अंधेरी येथील जनरल सेक्रेटरी तथा शिक्षण महर्षि प्राचार्य अजय कौल यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. गुणवंत शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान करून त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती संघटनेने पत्राद्वारे केली आहे.

 

हा गौरव समारंभ शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हरेंद्र लोखंडे विद्यालय (सायली स्कूल), बोरीवली (प.), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

सदर निमंत्रण  संघटनेचे अध्यक्ष आशीर्वाद लोखंडे,  उपाध्यक्ष सचिन गवळी, सचिव राजन महाडीश्वर आणि खजिनदार अनिलकुमार सिंह यांच्या वतीने देण्यात आले

 

टॅग्स:

#Education #Mumbai #BAHSS #SchoolHeads #Principal #EducationNews #MaharashtraNews9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button