आमची मुंबईमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

भूतानमध्ये मारवाडी युवा मंचाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक संपन्न

सेवा, संघटन विस्तार आणि डिजिटल माध्यमांवर महत्त्वपूर्ण चर्चा

 

अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पश्चिम बंगाल प्रांत, जयगाव शाखा आणि सिलीगुडी शाखेच्या संयुक्त आतिथ्यात फुंटशोलिंग, भूतान येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत आगामी सेवा उपक्रम, संघटनात्मक विस्तार आणि भविष्यातील कार्यनियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय मीडिया अँड टेक्नॉलॉजी फोरमचे चेअरमन श्री. सुनील जैन खाबिया यांनी सहभाग घेत संघटनेच्या भविष्यातील नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. डिजिटल युगात सेवा कार्य अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मीडिया आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. श्री. खाबिया यांनी माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरुणजी बजाज आणि श्री. ओमप्रकाशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “सेवा ही केवळ जबाबदारी नसून संस्कार, समर्पण आणि संघटनेप्रती निष्ठेची भावना आहे,” असे प्रतिपादन केले.

तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुरेशजी एम. जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. पंकजजी बराडिया, राष्ट्रीय महामंत्री श्री. मोहितजी नाहटा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. राहुलजी अग्रवाल यांच्यासह संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणीचे त्यांनी आभार मानले. उत्कृष्ट आतिथ्य व यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष क्षेत्र–१ श्री. आशीषजी अग्रवाल, जयगाव शाखाध्यक्ष श्री. महावीरजी राठी, श्री. जयंतजी मूंदडा, सिलीगुडी शाखाध्यक्ष श्री. सौगंधजी गोयल तसेच पश्चिम बंगाल प्रांत, जयगाव व सिलीगुडी शाखेच्या संपूर्ण टीमचे श्री. खाबिया यांनी अभिनंदन केले.

सेवा, संघटन आणि युवा शक्तीला नवी दिशा देणारी ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.महाराष्ट्र प्रांतमधून प्रांतीय अध्यक्षा श्रीमती अमृता जी भुतडा, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री रामकिशोर वर्मा, राष्ट्रीय संयोजिका श्रीमती पूनम बाल्दी, श्रीमती सुप्रिया सुराणा आणि श्री कपिल कर्णवट उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button