अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईमहाराष्ट्रमुंबई

शिवसेना अंधेरी पश्चिम व्दारे १००० नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्यावतीने विभागांतील १००० नागरिकांचे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया

*शिवसेना अंधेरी पश्चिम व्दारे १००० नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया*
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्यावतीने विभागांतील १००० नागरिकांचे विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डोळा हा अवयव अत्यंत संवेदनशील असून प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे, म्हणून प्रत्येकजण त्याची निगा राखत असतो. वाढत्या वयामुळे, अनुवांशिक व  अन्य आजारांमुळे मोतीबिंदू चा त्रास सुरु होतो, यामुळे दृष्टी अस्पष्ट होते, धूसर किंवा अंधुकपणा येतो. हा त्रास शस्त्रक्रिया केल्याने दूर होतो. 


मुंबई मधील डोळ्यांवरील विश्वसनीय उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लोटस आय हॉस्पिटल जुहू येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. सदर शस्त्रक्रियांचे काटेकोरपणे नियोजन करून नोंदणीकृत नागरिकाला शस्त्रक्रियेचे वेळ सूचित करण्यात येणार आहे. सदर मोतीबिंदू त्रास असलेल्या नागरिकांसाठी शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम सुवर्णसंधी घेऊन आली असून १००० नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी १७ नोव्हेंबर २०२१ पासून शस्त्रक्रिया सुरु होणार आहेत.

संजय मानाजी कदम संघटक . सुनिल खाबिया जैन समन्वयक.


शिवसेना अंधेरी पश्चिम चे विधानसभा संघटक संजय कदम व विधानसभा समन्वयक सुनिल  जैन खाबिया संकल्पनात्मक व धडाकेबाज कामांसाठी ओळखले जातात. हि जोडी वर्षाच्या अखेरीस जरी हा धमाका करत असले तरी याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. लॉकडाऊन चा परिणाम अनेक कुटूंबियांवर झाला आहे. तरी या नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा नक्की लाभ घ्यावा. त्वरित आपल्या शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम मध्यवर्ती कार्यालयात संपर्क करा व आपल्या नावाची नोंदणी करा. 


पत्ता :  शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम मध्यवर्ती कार्यालयशितलादेवी इमारत, इंडियन ऑइल समोर, डी. एन, नगर, अंधेरी पश्चिम -५३.संपर्क – भावेश जाधव – ९५९४३८१३२३ रोहन शिंदे – ९९२०११११६३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button