गुन्हेमहाराष्ट्रमुंबई

मानखुर्द रेल्वे स्टेशनवर पनवले बाजुचे ब्रिजचे पाय-यावर चित्त थरारक खुन करणाऱ्या आरोपीला अटक

गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेवुन 12 तासाचे आत पकडुन गुन्हयाची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष 6 चेंबुर चे पथकास यश......* 

*मानखुर्द रेल्वे स्टेशनवर पनवले बाजुचे ब्रिजचे पाय-यावर चित्त थरारक खुन करणाऱ्या आरोपीला अटक

 गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेवुन 12 तासाचे आत पकडुन गुन्हयाची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष 6 चेंबुर चे पथकास यश……* 


गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेवुन 12 तासाचे आत पकडुन गुन्हयाची उकल करण्यास गुन्हे शाखा कक्ष 6 चेंबुर चे पथकास यश मिळाले आहे . गुन्हे शाखा कक्ष 6 चेंबुर उल्लेखनीय कामगिरी करत आरोपीला अटक केली असुन घटना क्रम दि.20/11/2021 रोजी पहाट ४ वाजून ३९ मिनिट वा ते ४ वाजून ४० मिनिट  चे दरम्यान मानखुर्द रेल्वे स्टेशन फलाट नं.2 वर आलेल्या अप लोकलचे मधले लगेज डब्यातुन यातील अनोळखी इसम वर्णन वय अंदाजे 24 ते 25 वर्ष अंगाने मध्यम अंगात काळया रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व जीन्स पॅन्ट हा तसेच यातील मयत इसम नामे दिपक चंद्रकांत हिरे वय 29 वर्ष हे दोघे एका पाठोपाठ उतरुन त्या दोघांमध्ये लोकलमध्ये तसेच फलाटावर झालेल्या कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन झालेल्या वादा मुळे यातील अज्ञात इसमाने मयत इसम दिपक चंद्रकांत हिरे याचेशी झटापटी करुन त्यास कोणत्या तरी धारदार हत्याराने पोटामध्ये वार करुन जबर जखमी करुन त्याचा खुन केला .


  कक्ष-6 गुन्हे प्रकटीकरण शाखा, गु.अ.विभाग, चेंबूर, मुंबई यांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आसुन कलम गु र क्र 0160/2021 कलम 302 भादवि सह 135,37 (1) मपोका  वाशी रेल्वे पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 6 गुन्हे प्रकटीकरण शाखा चे अधिकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सदरचे खुनाच्या गुन्हयातील अनोळखी आरोपी बाबत काहीएक माहीती उपलब्ध नसताना तसेच रेल्वे पोलीस ठाणे यांचेकडील सीसीटीव्ही फुटेज वरुन अस्पश्ट असल्यामुळे काहीएक माहीती प्राप्त होत नव्हती. सीसीटीव्ही फुटेज चे बारकाईने अवलोकन करुन तसेच कक्ष 6 चेंबुर युनिटचे स.फौ नितीन सावंत यांना गोपनीय माहीती प्राप्त झाली कि , ‘‘ सदरच्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी हा खारघर नवी मुंबई परीसरातील असुन तो अभिलेखावरील गुन्हेगार आहे .  सदरची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद साळुंखे यांना अवगत करुन त्यांचे मार्गदर्शनाखाली कक्षाचे पथक तयार करण्यात आले  खारघर नवी मुंबई परीसर येथे मा.वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस निरीक्षक ननावरे,पोउनि मुठे ,सफौ सावंत/27535,पोना तुपे/980697 व पोषि चालक 071346 /केदार यांचे पथक हे आरोपीचे शोधकामी मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार खारघर नवी मुंबई येथे रवाना केले होते. 


खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता कोणतीही माहीती उपलब्ध नसताना कक्ष 6 चे पथकाने अथक परीश्रम करुन कोपरागाव खारघर नवी मुंबई परीसरातुन आरोपीस शिताफीने पकडले. आरोपीकडे गुन्हयाबाबत कसुन विचारणा केली असता आरेापीने गुन्हयाची कबुली दिली व गुन्हा केल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले. 


या आधी या अज्ञात इसमावर मानखुर्द पोलीस ठाण्यात 1)मानखुर्द पोलीस ठाणे गु र क्र 313/2010 कलम 354,506,34 भादवि, 


2 )मानखुर्द पोलीस ठाणे गु र क्र 61/2012 कलम 397,452,34 भादवि,


3) मानखुर्द पोलीस ठाणे गु र क्र 49/2014 कलम 394,34 भादवि,

 
4) मानखुर्द पोलीस ठाणे गु र क्र 59/2015 कलम 141, 143, 147, 149, 386, 387, 427,452,504,506 (2) भादवि सह 37(1),135 मपोका, आरसीएफ पोलीस ठाणे गु र क्र 415/2018 कलम 454,457,380 भादवि अश्या गुन्हयांची नोंद आहे.


सदर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी वैदयकीय तपासणी करुन वाशी रेल्वे पोलीस ठाणे मुंबई यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही मा.पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री मिलिंद भारंबे , मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),श्री विरेश प्रभु ,मा.पोलीस उपायुक्त ,श्री निलोत्पल  व मा.सपोआ डी पुर्व नितीन अलकनुरे साहेब, कक्ष 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ननावरे,पोउनि मुठे ,सफौ सावंत/27535,पोना तुपे/980697 व पोशी चालक 071346 /केदार यांचे पथकाने पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button