अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईमहाराष्ट्रमुंबई

मनसे उप विभाग अध्यक्ष किशोर राणे म्हणाले विहीर वाचवा लढा सुरुच राहणार

मुंबई महानगर पालिका मधील संबधित विभागाचे अधिकारी विहीर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत- किशोर राणे.

मनसे उप विभाग अध्यक्ष किशोर राणे म्हणाले विहीर वाचवा लढा सुरुच राहणार


मुंबई महानगर पालिका मधील संबधित विभागाचे अधिकारी विहीर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करत
आहेत- किशोर राणे.


विहीर जतन संवर्धन आणि संरक्षण फक्त कागदावरच प्रत्यक्षात अधिकारी देतात विहीर चोराला संरक्षण

किशोर राणे यांनी लोकायुक्त कडे केली तक्रार लवकरच कारवाई होण्याची शक्यता

किशोर राणे अंधेरी पश्चिम विधानसभा उप विभाग अध्यक्ष

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील अंधेरी पश्चिम विभाग मध्ये एक विकासक विहीर चोरी करणार होता म्हणजे ती विहीर हडप आणि गडप करणार होता.


मनसे अंधेरी पश्चिम विधानसभा उप विभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी संबंधित विकासकाचा मनसुबा उधळून लावला आहे परंतु सदर विकासक यांनी विहीर जरी बुजवली नसली तरी त्या विहिरीचे नैसर्गिक पाण्याचे झरे बंद केल्याचा आरोप केला आहे. 


सविस्तर माहिती अशी की अंधेरी पश्चिम मधील जे पी रोड वरील एका पुनर्विकास प्रकल्प करत असलेला विकासक री डेव्हलपमेंट योजनेंतर्गत  बिल्डिंग बांधत आहे व सदर ठिकाणी एक जुनी विहीर होती सदर विकासक यांनी इमारत विकासक करण्यासाठींचा प्रस्ताव सादर करताना या ठिकाणीं असलेली विहीर दाखवली नसल्याचा आरोप किशोर राणे यांनी केला व या बाबत कीटक नाशक विभाग (pco) यांच्या कडे व ईमारत व बांधकाम विभाग यांच्या कडे तक्रार केली असता सदर दोन्ही विभाग विकासक याला पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे व त्याला मदत करत असल्याचा संशय आल्या नंतर किशोर राणे यांनी सदर ची तक्रार लोकायुक्त यांच्या कडे केली आहे.


किशोर राणे यांनी सांगितले की जर सदर ठिकाणी विहिर होती आणि विकासक यांनी दी प्लान मध्ये दाखवली नाही याचा अर्थ सरळ आहे की विकासक याचा मनसुबा होता की विहीर गायब करायचा या बाबत इमारत व कारखाने विभाग यांनी महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिग ॲक्ट 1966 (MRTP) अंतर्गत गुन्हा दाखल करणअपेक्षित होते पण तसे न करता संबधित अधिकारी यांनी विकासक यावर कोणतीही कारवाई न करता त्याला पुरेसा वेळ दिला व पुन्हा प्लान मध्ये दुरुस्ती करून प्लान पुन्हा नव्याने सादर करण्याची संधी दिली व सुधारित प्लान सादर करताच एमआरटपी मागे घेतली असल्याचे किशोर राणे यांनी सांगितले.


मुंबई महानगर पालिका व के पश्चिम विभाग चे अधिकारी हे विकासक याला पाठीशी घालत आहेत व कारवाई साठी टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट लोकायुक्त यांच्या कडे धाव घेत संबधित अधिकारी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
आता पाहणे गरजेचे आहे की विहिर वाचेल की अधिकारी वाचतील का मग अंधेरी पश्चिम मधील एक विहिर गायब झाल्याची बातमी येईल..

पुढील अंकात वाचा विकासकाला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अधिकाऱ्यांची नावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button