नागपूरमहाराष्ट्रमुंबई

मनसेचे कर्नाटक सरकार विरोधात तीव्र निदर्शने: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.

मनसेचे कर्नाटक सरकार विरोधात तीव्र निदर्शने: छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.


कर्नाटक येथील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे कर्नाटक सरकार विरोधात तीव्र नारे निदर्शने करण्यात आली.


नागपूर महाल गांधी गेट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मनसे कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, कर्नाटक सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार जागे व्हा, केंद्र सरकार मुर्दाबाद, अश्या जोरदार घोषणा दिल्या . राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी घडलेल्या महाराजांच्या अवमान घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही असा आरोप मनसेने यावेळी केला व केंद्र तसेच राज्य सरकारचा निषेध केला.


भाजपशासित कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांची गळचेपी सुरू असून आता महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अपमान करणारी घटना बंगळुरू येथे घडते आणि केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेते हे अतिशय निंदनीय आहे , दोषींवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत भाजपशासित कर्नाटक सरकारने दाखविली नाही हे लज्जास्पद असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी या अवमान घटनेला हलक्यात घेऊ नये, निव्वळ स्पष्टीकरण देऊन चालणार नाही, तातडीने केंद्र व कर्नाटक सरकारला या प्रकरणी धारेवर धरून या घटनेविरोधात दोषी असलेल्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक कारवाई होण्यासाठी तातडीने पाऊले उचलावी अन्यथा मनसे नागपूर तर्फे कर्नाटक, राज्य, केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी मनसे पदाधिकारी यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत, कर्नाटकातील स्थानिक मराठी भाषिकांवर भ्याड हल्ले करू नका नाहीतर नागपुरात तुमचा बंदोबस्त करायला मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांना वेळ लागणार नाही असा सूचक इशारा मनसे नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे यांनी कर्नाटक सरकारला दिला.


यावेळी प्रामुख्याने मनसे पदाधिकारी उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम व रजनीकांत जिचकार, विभाग अध्यक्ष शशांक गिरडे, उमेश बोरकर,तुषार गिऱ्हे, वाहतूक जिल्हा संघटक सचिन धोटे, मंगेश शिंदे, जिल्हा सचिव मनोज गुप्ता, विभाग उपाध्यक्ष अंकित झाडे, राजेंद्र पुराणिक, पवन साहू,नितीन टाकळीकर,चेतन बोरकुटे, विभाग सचिव राहुल वंजारी व महेश माने,विद्यार्थी सेनेचे दत्ता साकुलकर, गौरव पुरी, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा मनीषा पापडकर, जनहित जिल्हा अध्यक्ष इकबाल रिझवी, महिला सेनेच्या अर्चना कडू, स्वाती जैस्वाल, वैशाली फुलझेले, अनु सहारे, मध्य विभागाचे श्रीकांत निकम, प्रकाश शिंदे ,अनिल चिपाटे , अतुल गायकवाड, ओंकार चन्ने ,प्रज्वल देशमुख , गौरव मुलमुले, शंतनू तिजारे, प्रयाग नन्नावरे, लेखराज पराते , सागर उमरेडकर , मोपेश वाकोडीकर , पिंटू कुहीकर , राजू पत्राळे, सुनील बनकर , प्रितेश राऊत, पूर्व विभागाचे मोहन महल्ले, लखन शाहू , ललित तंडेल, निखिल कुकटे, हरीश मोहाडीकर , अक्षय बिलवणे, राहुल जैस्वाल, राकेश वानखेडे, उत्तर विभागाचे श्याम रहांगडाले, राम हेडाऊ,संदीप चौरे, स्वप्नील बांगडे, विजय त्रिवेदी, किशोर भोयर, रोजगार सेलचे सागर लारोकर, सचिन निमजे, कोमल खवसे, तुषार कुंभारे ,मानसिंग शाहू , कैलास गीतलंहरे ,कमलेश खवसे , भूमेश गोखले, द. प. विभागाचे अक्षय दहीकर, मोहित हिरडे, अमेय पांडे,राहुल साखरकर, नरेंद्र कोडे, वाहतूक सेनेचे अरुण सेलोवार, प्रभुदास डोंगरे, प्रवीण गायकवाड, युवराज तलेगावकर, संदीप बांडे, सचिन पोगरे, विशाल शेंद्रे, आदित्य सेनर, इत्यादी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्धी पत्रकात शहर सचिव घनश्याम निखाडे व शाम पूनियानी यांनी कळविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button