मंडणगडमहाराष्ट्रराजकीय बातमी

मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत वाल्मिकीनगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दण दणीत विजय..

वाल्मिकनगर ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक १ मधील सर्वसाधारण प्रभागातून सुलोचना कोंबेकर १५९ मते मिळवून झाल्या विजयी

मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत वाल्मिकीनगर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दण दणीत विजय..

२२ डिसेंबर २०२१ रोजी मंडणगड तहसिल कार्यालयात मतमोजणीचा कार्यक्रम संपन्न झाला. वाल्मिकनगर ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक १ मधील सर्वसाधारण प्रभागातून सुलोचना कोंबेकर १५९ मते मिळवून विजयी झाल्या पराभुत उमेदवार भारती पाटील यांना ५२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून मुफिदा माटवणकर ८४ मते मिळवून विजयी झाल्या पराभुत उमेदवार धनश्री बसवत यांना ६० मते मिळाली.मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडण्यासाठी तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

ग्रामपंचायत वाल्मिकनगरातील दोन्ही उमदेवारांचे निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पार्टीचे कार्यालयात आयोजीत कार्यक्रमात अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मंडणगड तालुका अध्यक्ष श्री.मुझ्झफर मुकादम,प्रांतीक सदस्य भाई पोस्टुरे,माजी जि.प. सदस्य प्रकाश शिगवण,मा.नगरसेवक सुभाष सापटे,शिपोळे ग्रामपंचायत सदस्य श्री. हसरत खोपटकर,युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर,पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर,जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, माजी नगरसेवक राहूल कोकाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button