खेडदापोलीमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय बातमी

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना दिले निवेदन

ईडी कडुन झालेल्या बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध

अनिरुद्ध कदम (दापोली प्रतिनिधी) – दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मंत्री श्री.नवाब मलीक यांना केंद्र सरकारच्या सांगण्यावरून ईडी कडुन झालेल्या बेकायदेशीर अटके बद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याबतचे खेड तहसीलदार श्री.प्राजक्ता घोरपडे मॅडम यांना दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार संजय कदम व जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्याचे मंत्री नवाब मलीक यांना केंद्राच्या दबावाने सक्तवसुली संचानालय विभागाने (ईडी) काही सुचना तसेच काही नोटीस न देता केवळ सुड बुद्धीने व आकसापोटी दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यांच्या कार्यालयात नेले व अटक केली आहे.सदर अटकेची कारवाई ही पुर्णतः चुकीच्या पद्धतीने झाली आहे.म्हणुनच या घटनेचा रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा व सक्तवसुली संचानालय विभागाचा जाहीर निषेध करत आहोत..

सदर वेळी दापोली विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रा अध्यक्ष मुजीब रूमाणे, गुहागर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे,जलाल राजपुरकर,तालुकाध्यक्ष सतु कदम, महीला तालुकाध्यक्ष सौ.निधी विठ्मल,मा.युवक तालुकाध्यक्ष श्री.सचिन पवार,जिल्हा परिषद सदस्या नफिसा परकार,अल्पसंख्याक खेड अध्यक्ष मुख्तार कालेकर,खेड शहराध्यक्ष राजु शेठ संसारे,युवती शहराध्यक्षा अँड सौ‌.पुजा तलाठी,सवेणी ग्रामपंचायत सदस्य उमेश देवरूखकर,मा.पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे,मा.पचायंत समिती सदस्य श्रीधर गवळी,धामणी मा.सरपंच ग्रामपंचायत उमेश कदम,ऐनव्हरे मा.सरपंच संजय जाधव,भरणे ग्रामपंचायत सरपंच संदिप खेराडे,पोयनार ग्रामपंचायत सरपंच विचारे,ग्रामपंचायत सदस्या सौ.पड्याळ,हेदली ग्रामपंचायत सदस्या सौ.हिना कुडुपकर,नितिन डेरवणकर,प्रदीप सकपाळ,आप्पा पवार,बबलु सकपाळ,आरीफ काणेकर,खलील कडवेकर, तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button