आपली मुंबईआरोग्यमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक
Trending

विभागातील 8000 महिलांना आरोग्यास पूरक सॅनेटरी पॅड पॅकेट चे दरमहा मोफत वाटप”

“विभागातील 8000 महिलांना आरोग्यास पूरक सॅनेटरी पॅड पॅकेट चे दरमहा मोफत वाटप”
“प्रशिक्षित महिला सुरक्षित आरोग्य”

जन प्रहार फाऊंडेशन चे अध्यक्ष रविकांत सर्वदानंद शुक्ला यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विभागातील महिलांसाठी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अंधेरी भागात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी इकॉनॉमिक टाईम्स मधील उप संपादक ह्या हुद्यावर कार्यरत असलेल्या सलोनी शुक्ला जी, Bollywood Actress आणि प्राणी मित्र, सामजिक कार्याची आवड असणाऱ्या अशमित (अंजू) ब्रार, तसेच त्रिशरन महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. वैशाली अंभुरे ह्यांच्या उपस्थितीत BMC द्वारे प्रशिक्षण घेतलेल्या त्रिशरण महिला बचत गटास सॅनेटरी पॅड बनविण्याच्या उद्योग निर्मिती करण्यास संपूर्ण पाठिंबा देवून त्यांनी तयार केलेल्या “सेफ केअर” सॅनेटरी पॅडचे अनावरण करण्यात आले असून दरमहा विभागातील 8000 महिलांना ह्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

सामान्य महिलांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना स्व – ओळख होण्याच्या निर्धाराने जन प्रहार फाउंडेशन द्वारे नियमित विविध उपक्रम राबविले जात आहे आणि त्याचाच एक भाग सन्मान स्त्री कर्तृत्वाचा सन्मान स्त्री शक्तीचा.


विभागातील विविध क्षेत्रांमधील कर्तुत्वान असलेल्या सामान्य महिला ज्येष्ठ नागरिक असून देखील सामजिक कार्याची आवड, स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ, असणाऱ्या सविता परब मावशी, मनिषा कुडव मावशी ज्या वयाच्या 71 व्या वर्षी देखील फार उत्साहाने लहान मूलांना मालिश करणे काम करीत आहे.

यांना देखील सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. योग शिक्षिका आशा ताई पवार, उद्योजिका ज्योती पवार, तसेच केबलचा व्यवसाय करणाऱ्या भारतीताई वाकचौरे, यांना देखील सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये विभागातील लहान मुले व पालक वर्ग यांच्या सोबत कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचादेखील सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आले.


विभागातील बचत गटातील महिला सदस्य, तसेच अंगणवाडी सेविका यांनी सांस्कृतिक, पारंपारिक नृत्य तसेच स्त्रीभ्रूणहत्या वर पथनाट्ये देखील सादर करून उपस्थित महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानून महिलांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button