आमची मुंबईमहाराष्ट्रशैक्षणिक

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण; राज्याचा एकूण निकाल ९६.९४ टक्के

💥 दहावीच्या निकालात मुलींची बाजी; ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण; राज्याचा एकूण निकाल ९६.९४ टक्के

👉 कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

◼️मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

महाराष्ट्र न्यूज ९ चे मुख्य संपादक नागेश कळस गौंडे यांची कन्या संचिता कळसगौंडे हीने ९४.२०% गुण मिळवत दहावी मध्ये घवघवीत यश मिळवले आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे.

नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेला १६,३८, ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९, ५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९, ४५८ एवढी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button