Uncategorizedखेडमहाराष्ट्ररत्नागिरीशैक्षणिक

प्रभात हायस्कूल शिवतर येथे वाय.बी.सोशल ग्रुप बोरीवली मुंबई यांच्या वतीने विज्ञान साहित्य वाटप सोहळा संपन्न!

दि.१२ नोव्हेंबर २०२२
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर येथे वाय.बी.सोशल ग्रुप बोरीवली मुंबई यांच्या वतीने विज्ञान साहित्य वाटप सोहळा संपन्न!


(नितिन नगरकर प्रतिनिधी)- खेड(रत्नागिरी): खेड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवतर येथील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर येथे वाय.बी.सोशल ग्रुप बोरीवली मुंबई यांच्या वतीने प्रशालेला विज्ञान साहित्य देण्यात आले.प्रशालेचे माजी विद्यार्थी व लक्ष्मीनारायणवाडी शिवतर मधील सन्माननीय श्री सुनील बाबुराव भोसले व शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री सुनील रामचंद्र मोरे साहेब यांच्या प्रयत्नातून सुनील भोसले साहेब यांचे सुपुत्र श्री रोहन सुनील भोसले व वाय.बी.सोशल ग्रुप चे प्रमुख सन्माननीय श्री अनिरुद्ध राणे साहेब यांच्या माध्यमातून वाय.बी.सोशल ग्रुप बोरीवली मुंबई यांच्या वतीने विद्यार्थीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच विज्ञान विषयाविषयी आवड निर्माण व्हावी हा उदात्त दृष्टीकोन ठेवून प्रशालेला आवश्यक असणारे विज्ञान साहित्य प्रदान करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी वाय.बी.सोशल ग्रुप बोरीवली चे प्रमुख अनिरुद्ध राणे साहेब,रोहन भोसले व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संसथेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीराम सयाजीराव पालांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी शाळा समितीचे चेअरमन श्री शशिकांत सहदेव कदम,व्हाईस चेअरमन श्री शिवाजी पांडुरंग मोरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री काशीनाथराव गणपत मोरे उपाध्यक्ष राजेश सुर्वे, विद्या परीषद सदस्य व शिवतरगाव तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिपक सुर्वे,प्रशालेचे मुख्याध्यापक काझी सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


वाय.बी.सोशल ग्रुप च्या वतीने रोहन भोसले, अनिरुद्ध राणे,व गायकवाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी या वाय.बी.सोशल ग्रुप च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थीशी संवाद साधून १०वी नंतर च्या अभ्यासक्रम विषयी व करीयर विषयी मार्गदर्शन केले.


शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे साहेब, चेअरमन शशीकांत कदम साहेब,व्हाईस चेअरमन शिवाजीराव मोरे यांनी वाय.बी.सोशल ग्रुप यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल शुभेच्छा व धन्यवाद दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक काझी सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व विज्ञान साहित्याचा अध्यापनात उपयोग करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच वाढेल व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी आवड निर्माण होईल याबद्दल सर्वांना ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button