अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

हर दिल अजीज हसमुख सदा प्रसन्न राहणारे व नेहमी सर्वांच्या मदतीला धावणारे सुनिल खाबिया जैन यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

हर दिल अजीज हसमुख सदा प्रसन्न राहणारे व नेहमी सर्वांच्या मदतीला धावणारे सुनिल खाबिया जैन यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 

उत्तम प्लॅनर उत्तम संयोजक नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी करणारे आणि नेहमी प्रत्येक कामात यश मिळवणारे व्यक्ती म्हणजे सुनिल खाबिया जैन

एक प्रवास सुनिल खाबिया जैन यांचा सुनिल खाबिया जैन यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९७४ रोजी धुळे जिल्हातील मूकटी या गावी जैन मारवाडी कुटुंबात  झाला. यांचे प्राथमिक शिक्षण गुढे , ता. भडगांव जि. जळगांव येथे झाले. तसेच पदवी चे शिक्षण नाशिक येथून पूर्ण केले. घरात उद्योग व्यापाराचे वातावरण होते परंतु व्यवसाय गावापुरता मर्यादित होता. आपल्याला उद्योजक बनायचंय हे मनाशी ठाम केलं होतं, आणि तशीच वाटचाल चालू  होती.  कॉलेजला शिक्षण घेत असताना पत्रकारीते मध्ये रुची निर्माण झाली म्हणून त्यांनी अनेक वृत्तपत्रांना बातम्या देण्याचे काम केले. या दरम्यान कॉलेजमधील व हॉस्टेल मधील समस्यांवर मात करण्यासाठी मुलांना एकत्रित करून विविध कल्पकतेने योजना  राबविल्या. तिथून नेतृत्व गुण उभारीस आले. कॉलेजमधील सर्वांचा मित्र तसेच शिक्षकांचा लाडका विद्यार्थी अशी ओळख निर्माण झाली. 

पत्रकारीता करत असल्याने निर्भीडपणा अंगी आला ज्यामुळे कोणत्याही समस्येवर मात करण्याचे बळ मिळाले. याचदरम्यान अनेक राजकारणी व्यक्तींशी संबंध आल्यामुळे राजकारणात आवड निर्माण होऊ लागली, नवीन काही शिकत राहण्याची आस असल्याने इथेही त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. असं म्हणतात जर राजकारण शिकायचंय अनुभवायचं तर राजकारणात वर्चस्व असलेल्या माणसाचं अनुकरण करावं त्यांच्याकडून शिकावं.  म्हणून यांनी हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे अनुकरण केले. आजही  व्यवसायात किंवा सामाजिक जीवनात कधी मनाची घुसमट होत असेल तर यावर एकच उपाय बाळासाहेबांची भाषणं ऐकायची, सहजतेने एक हिंमतीचा किरण आपल्याला मिळतो. कॉलेज संपल्यानंतर स्वतःचे साप्ताहिक “सिटी लेटर” साप्ताहिक काढून हिंदुह्रदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित केले. 

 लहानपणासून काही ना काही करण्यात व्यस्त असल्याने कमालीचं उर्जावान व्यक्तिमत्व, कॉलेजवयीन असल्यापासून लोकांच्या संपर्कात असल्याने एखाद्याच्या मनाचा ठाव घेण्याची लखब काही वेगळीच. एकदा एखादा व्यक्ती संपर्कात आला कि तो आयुष्यभरासाठी जोडला गेला पाहिजे हा सदैव मानस.  सहकारी व संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या सुखदुःखात सोबत राहण्याचा त्यांचा स्वभाव त्यांचं वेगळंपण सिद्ध करतो. त्यांचा मितभाषी स्वभाव अनेकांना ऊर्जा देतो त्यातीलच मी एक म्हणूनच मी माझ्या महाराष्ट्र न्यूज 9 वेब न्यूज पोर्टल चे उद्घघाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते केले.

याचबरोबर आपल्या व्यवसायांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामध्ये  मेडिकल क्षेत्र , पॅकेजिंग, बिल्डर या व्यवसायात मुंबई व मुंबई बाहेर यश संपादन केले आहे. आज एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख आहे. या यशस्वी व्यावसायिकाला समाजसेवेची किनार होतीच म्हणून व्यवसाय करताना सुद्धा समाजसेवेचा विचार मनाच्या हळव्या कोपऱ्यात होता. म्हणून निखळ समाजसेवा करणाऱ्या अखिल भारतीय मारवाडी युवा मंच या संस्थेची मुंबई शाखा स्थापित करून समाजकार्य सुरु केले. मुंबई चे अध्यक्ष असतांना मूंबई शहरातील व्यस्त रेल्वे स्टेशनवर सातत्याने रक्तदान शिबीरचे आयोजन केले. आपल्या कार्यकाळात रक्तदान शिबिरांचा असा धडाका लावला कि मुंबई शाखेला रक्तदाता शाखा या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 

महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी युवा मंच प्रांतीय अध्यक्ष च्या २०१५ च्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले. तीन वर्षाच्या कार्यकाळात सर्व शाखांव्दारे भव्य दिव्या समाजकार्य करून यशस्वीपणे नेतृत्व केले. या तीन वर्षाच्या कार्यकाळात १२० शाखांमधील एकाही शाखेचा विरोध झाला नाही तसेच सर्वांचे लाडके दमदार हंसमुख प्रांतीय अध्यक्ष म्हणून प्रचिलित झाले. अखिल भारतीय मारवाडी युवा मंच राष्ट्रीय उपाध्यक्ष क्षेत्र ५, २०१८ च्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाले. आज राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर कार्यरत असतांना अनेक नवनवीन संकल्पनात्मक कार्य करत अनेक समाजपयोगी उपक्रम देशभरात चालू आहेत. 

*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे बाळकडू अगदी किशोरवयातच घेतले होते. साहेबांचे भाषणे ऐकून तसेच अग्रलेख वाचून त्यांचे विचार मनात घर करून होते. गेली १९ वर्ष सातत्याने शिवसैनिक म्हणून अविरत कार्यरत आहेत. पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना सुद्धा विविध शिवसेना शाखांशी जोडून लोकांसाठी काम करत राहिले. अनेक संस्थामार्फत परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त काम केली. गेली अनेक वर्ष शिवसेना पक्ष संघटन व पक्षकार्यासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शिवसेना पक्षप्रमुख/ मुख्यमंत्री मा. ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे व परिवहन मंत्री / विभागप्रमुख / आमदार ॲड. अनिल परब साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम च्या विधानसभा समन्वयक पदावर नियुक्ती केली.  गेल्या तीन वर्षात विधानसभा पदाधिकाऱ्यांमध्ये वैचारीक एकजूट व समन्वय साधत आपल्या कार्याचा आलेख सातत्याने उंचावत आहेत. शिवसेना घराघरांत पोहचविण्यासाठी तळमळीने सर्वांच्या सहकार्याने संकल्पनात्मक कार्य करत आहेत.* 

*अशा दमदार, खुशमिजाज, कार्यकुशल नेतृत्व मा.श्री सुनिल मदनलाल खाबिया जैन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button