Uncategorized

मनसेने केले आंदोलन BMC अधिकाऱ्याची झाली उचलबांगडी, के पश्चिम विभाग मधील काय आहे प्रकरण?

मनसेचा दणका सोमेश शिंदेची झाली उचलबांगडी

मनसेने केले आंदोलन BMC अधिकाऱ्याची झाली उचलबांगडी, के पश्चिम विभाग मधील काय आहे प्रकरण?


मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग मधील वर्सोवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून या बांधकामांना अभय देणाऱ्या के पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या इमारत व कारखाने विभागाचे दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांची बदली व्हावी, यासाठी मनसेने आंदोलन पुकारले होते.


मनसेच्या या आंदोलनानंतर सोमेश शिंदे याची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना के पश्चिम कार्यालयातून कार्यमुक्त करत पाणी खात्यात पाठवत असल्याचे आदेश देणारे पत्र के पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले आहे. आमच्या आंदोलनामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असल्याचा दावा मनसे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी केला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई म्हणाले की, ”मागील अनेक दिवसांपासून के पश्चिम प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असुन या सर्व अनधिकृत बांधकामांना दुय्यम अभियंता अभियंता सोमेश शिंदे यांचे अभय होते. प्रत्येक इमारतीच्या स्लॅबनुसार लाचेची रक्कम ठरलेली होती या संदर्भात सर्वपक्षीयांनी अनेकदा सोमेश शिंदे याच्या विरोधात सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र सत्ताधारी पक्षाचा राजकीय वरदहस्त लाभलेल्या या भ्रष्ट अधिकारी सोमेश शिंदेवर कारवाई मात्र होत नव्हती.”

या विरोधात १८ ऑक्टोबर रोजी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून मनसे कडून इशारा देण्यात आला होता की ईमारत व कारखाणे विभागाचे भ्रष्ट अधिकारी सोमेश शिंदे यांच्या विरोध कारवाई करा अन्यथा मनसे आज हात जोडून निवेदन करत आहे. आणि कारवाई नाही झाली तर मनसे नंतर हात सोडून निवेदन करणार आहे. मनसेच्या आंदोलनानंतर भ्रष्ट अधिकारी सोमेश शिंदे यास पालिका के/पश्चिम विभागा कार्यालय मधून कार्यमुक्त केले असुन तसे आदेश देणारे पत्र के पश्चिम विभाग सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले आहे. आणि मनसेच्या आंदोलन यशस्वी झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button