आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईविशेष

माजी नगरसेविका प्रिती सातम यांच्या प्रयत्नांना यश वालभाट नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत एसटीपी प्रकल्पाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरण व नदीचे संवर्धनासाठी खुप गरजेचे .-खासदार गोपाळ शेट्टी

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरण व नदीचे संवर्धनासाठी खुप गरजेचे .-खासदार गोपाळ शेट्टी


वालभाट नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत एसटीपी प्रकल्पाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते भूमिपूजन
.
मा. नगरसेविका सौ प्रिति सातम यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू .

मुंबई महापालिकेच्या नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अनेक नद्यांचे पुनरुज्जीवन सुरू असून गोरेगाव पूर्व आरे जंगलातून उगम पावणारी वालभाट नदी पुनरूज्जीवन व सुशोभीकरण काम सुद्धा त्या अंतर्गत घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणचा पाहिला टप्प्यातील मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन उत्तर मुंबई चे खासदार श्री गोपाळ शेट्टी जी यांच्या हस्ते 8 नोव्हेंबर रोजी धीरज वैली गोकुळधाम गोरेगाव पूर्व प्रभाग 52 येथे पार पडला. या प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ प्रिती सातम यांचा या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.


खासदार श्री गोपाल शेट्टी यांनी या वेळी सौ प्रिति सातम यांच्या कामाचे कौतुक करून आपल्या लहानपणी दहिसर, पोइसर या नद्या राष्ट्रीय उद्यानातून निघताना किती स्वच्छ असायच्या याचा अनुभव सांगून पुन्हा एकदा वालभाट सारख्या नद्यांना त्यांचे मूळ स्वरुप प्राप्त होणार असल्याचे समाधान व्यक्त केले त्याच पद्धतीने लोकप्रतिनिधीनी व नागरिकांनी या सर्व कामावर लक्ष ठेऊन ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री करावी अशी सूचना केली.


मा. नगरसेविका सौ प्रिती सातम यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की नदीला आपलं मूळ रूप प्राप्त करून देण्याचा जो प्रकल्प महापालिकेने हाती घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत आरेच्या जंगलामधून निघून ओशिवरा खाडीला मिळणारी ही वालभाट नदी ज्याला आपण म्हणतो वालभट नाला म्हणतो त्या नदीचं सुशोभीकरण/ पुनरुज्जीवन कामाची सुरुवात होत असून त्याअंतर्गत मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प त्याचे भूमिपूजन होत असून त्यामुळे तबेला, इंडस्ट्रीज व रहिवाशी विभागातून नदी प्रदुषित करणारे सांडपाणी व या प्रदूषणामुळे या नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे त्यावर

प्रक्रिया करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत एसटीपी त्याचा कामाची सुरवात होत आहे त्याच पद्धतीने नदीमध्ये झालेले अतिक्रमण, भराव काढून टाकणं नदीचं पात्र रुंद करणे त्याच्यासोबत नदीच्या दोन्ही बाजूने रस्त्याची व्यवस्था करणे झाडे लावून त्या ठिकाणी सुशोभीकरण करणं लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स भाग इतकंच नव्हे तर नदीमध्ये फिरण्यासाठी बोटिंगची व्यवस्था अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत, पुढच्या काही वर्षांमध्ये या सगळ्या नाल्याचा रूपांतर नदीमध्ये झालेलं असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला आणि त्यानंतरच्या आपल्या लहान मुलांना आणि आपल्या सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल.


या प्रसंगी भाजपचे वार्ड 52 मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button