आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईराजकीय बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसने यामिनी पांचाळ यांची मुंबईतील गुजराती सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती 

राष्ट्रवादी काँग्रेसने यामिनी पांचाळ यांची मुंबईतील गुजराती सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी दिले नियुक्ती पत्र 

मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने यामिनी पांचाळ यांची मुंबईतील गुजराती सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यामिनी पांचाळ या कर्तव्यदक्ष पक्ष कार्यकर्त्या असून त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. घाटकोपर येथे त्यांना पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मुंबई उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी, प्रदेश प्रतिनिधी अशोक पांचाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यामिनी पांचाळ यांनी शहरातील गुजराती लोकांचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी एका महिलेकडे दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानले. यामिनी पांचाळ म्हणाल्या की, मुंबईत लाखो गुजराती राहतात आणि शहराच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे, मात्र प्रत्येक राजकीय पक्ष त्यांचा फक्त मतदार म्हणुन निवडणुकी पुरता वापर करतात. गुजराती समाजाचे प्रश्न सोडवत नाहीत किंवा त्यांचे योग्य प्रतिनिधित्व केले जात नाहीत, आता मला ही जबाबदारी मिळाली आहे मी माझ्या गुजराती समाजाचे प्रश्न सोडविण्याचा पुर्ण पणे प्रयत्न करीन असा माझ्या पक्ष श्रेष्ठींना शब्द देते असे नव नियुक्त मुंबई गुजराती समाजाचे नव नियुक्त अध्यक्ष यामिनी पांचाळ यांनी सांगितले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button