महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

चिल्ड्रन्स वेलफेअर सेंटर येथे जिल्हा विज्ञान प्रदर्शन सांगता समारंभ उत्साहात संपन्न


मुंबई – आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आहेत आणि आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सांगता समारंभात केले.
विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळून त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये वाढ होते त्यासाठी विज्ञान प्रदर्शन काळाची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसह प्रत्येकाने जागृत राहणे गरजेचे आहे. विज्ञानाची सृष्टी आपण सर्वांनी स्विकारली परंतू विज्ञानाची दृष्टी पुर्णता स्विकारल्याचे दिसत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर विधायक कामासाठी झाल्यास समाज व देश सर्वांगिण प्रगती साधू शकेल.

विद्यार्थ्यांना यातून स्पर्धात्मक विकास साधता येण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता आहे असे मत चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल शाळेचे सर्वोसर्वे प्राध्यापक श्री. अजय कौल सरांनी व्यक्त केले. शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे सरांनी पश्चिम उपनगरातील मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाशी उत्कृष्ट समन्वय साधून विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभागाच्या वतीने पश्चिम विभागातील एकूण २२५ शाळांचा सहभाग असलेल्या एका आगळ्या-वेगळ्या “समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान ” ( Science and Technology Society)” या विषयावरील जिल्हास्तरीय, विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २१,२२ व २३ डिसेंबर २०२३ रोजी चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लाराज् कॉलेज ऑफ कॉमर्स, यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते . विभागातील ५०० शाळांमधील सुमारे ८,००० ते १०,००० विद्यार्थी, पालक, शिक्षक या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला.


२३ डिसेंबर २०२३ रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा सांगता समारोह चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लाराज् कॉलेज ऑफ कॉमर्स, यारी रोड, वर्सोवा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला मख्याध्यापिका शर्लिन पाँल मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन सर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. विज्ञान प्रदर्शनाच्या सांगता समारंभास सर्व शाळेचे मुख्याध्याक व शिक्षकांची, पालकाची व विद्यार्थ्यांची उपस्थीती होते

चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे सर्वेसर्वा प्राचार्य अजय कौल सर यांनी या विज्ञान प्रदर्शनीचे उत्कृष्ट आयोजन केले. शाळेचे उपक्रम प्रमुख श्री. प्रशांत काशिद सर यांनी विज्ञान प्रदर्शनात विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या संयोजनासाठी विशेष परीश्रम केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या विज्ञान प्रदर्शनासाठी विशेष शुभेच्छा दिल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button