एकच लक्ष्य, एकच ध्यास, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा
महायुतीची शिवाजी पार्क, दादर येथे भव्य संयुक्त सभा विराट जनसागराच्या उपस्थितीत सभा संपन्न

एकच लक्ष्य, एकच ध्यास, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या मुंबई महानगर पालिका साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची शिवाजी पार्क, दादर येथे भव्य संयुक्त सभा विराट जनसागराच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली.
या प्रसंगी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी घणाघाती भाषण करून ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यातील हवा काढून टाकली. मुंबई ही मराठी माणसांची आणि महाराष्ट्राचीच आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच मुंबईच्या विकासाकरिता करण्यात आलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेत पुढे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे जी यांनी कुणाच्याही बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येणार नाही, असे ठामपणे सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंना मराठीचा पुळका येतो, असे सांगत या बंधूंच्या पोकळ भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी मुंबईकरांना केले.

यावेळी मंचावर केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले जी, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री विनोद तावडे जी, मा. केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, राज्याचे उद्योग मंत्री श्री. उदय सामंत जी, शिवसेनेचे नेते श्री रामदास कदम जी, महाराष्ट्र राज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम जी, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमय्या जी, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ, राज्यसभा खासदार मा. श्री. मिलिंद देवरा जी, आमदार श्री. प्रवीणभाऊ दरेकर, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. श्री. मिहीर कोटेचा जी, आ. श्री. पराग अळवणी जी, आ. श्री. अतुल भातखळकर जी आदी मान्यवरांसह महायुतीचे सर्व उमेदवार, आजी-माजी खासदार, आजी-माजी आमदार तसेच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#BMCElection2026 #MissionBMC #Mumbai #AmeetSatamWithMumbai #बृहन्मुंबई_महानगरपालिका
@bjp4india @bjp4maharashtra @bjp4mumbai @devendra_fadnavis @mieknathshinde @dr.ramdasathawale @tawde_vinod @piyushgoyalofficial @advocateashishshelar @mp.lodha



