आपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबई

शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र २०४ मध्ये आज होणार ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच छत्री वाटप

शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र २०४ मध्ये आज होणार ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा तसेच छत्री वाटप

(सतीश अस्वले पाटील प्रतिनिधी)
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज शनिवार दि १८ जून २०२२ रोजी प्रभाग क्र. २०४ मधील परळ-लालबाग- काळाचौकीतील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान तसेच त्यांना छत्री वाटप नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या संकल्पनेतून करण्यात येणार आहे. महर्षी दयानंद महाविद्यालय परळ येथे सायंकाळी ७ वा हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात माजी नगरसेवक नागेश पवार, मनीषा सावंत, सुधाताई मेहेर, वैशाली किर्वे, वंदना शिंदे, प्रदीप (बाबा) जाधव, माजी उपविभागप्रमुख भारत म्हाडगुत, रंजन चौधरी, माजी शाखाप्रमुख सुरेश पाटकर, कार्यालय प्रमुख उमाकांत मिरकर, रमेश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, माजी आमदार तसेच पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू (दादा) सकपाळ, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, उपविभाग प्रमुख गजानन चव्हाण, पराग चव्हाण, शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखा संघटक कांचन घाणेकर तसेच विधानसभेतील आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button