खासदार रविंद्र वायकर यांचा वीर जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ ‘एक झाड शहिदांच्या नावे’ उपक्रम*
३१ मे रोजी आरे कॉलनी मध्ये सकाळी ७.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम व स्वच्छता मोहीम
*खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून*
*वीर जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ ‘एक झाड शहिदांच्या नावे’ उपक्रम*

– ३१ मे रोजी आरे कॉलनी मध्ये सकाळी ७.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम व स्वच्छता मोहीम
– एकूण ५००० झाडे लावण्याचा संकल्प
×
– आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाच्या पी दक्षिण व के पूर्वचे अधिकारी, वन अधिकारी, सामाजिक संस्था, विविध महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी, स्थानिक मंडळे, स्वयंमसेवी संस्था राहणार उपस्थित
*मुंबई :*
देशाच्या रक्षणासाठी अनेक जवानांनी कुटुंबाची पर्वा न करता आपल्या प्राणाचे बलिदान दिले. शहीद जवानांनी देशासाठी दिलेले हे बलिदान विसरू नये यासाठी त्यांच्या स्मरणार्थ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून “एक झाड शहिदांच्या नावे” हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ मे रोजी सकाळी ७.३० वाजता आरेमध्ये या उपक्रमास सुरुवात होणार आहे.
आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक पेड मां के नाम” हा उपक्रम राबवून लोकांना झाडे लावण्याचे आव्हान केले होते. यालाच अनुसरून “एक झाड शहिदांच्या नावे” हा उपक्रम आपल्या वीर जवानांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी घेण्यात आला आहे. यामध्ये आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाच्या पी दक्षिण व के पूर्वचे अधिकारी, वन अधिकारी, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी, सामाजिक संस्था, विविध महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी, स्थानिक मंडळे, स्वयंमसेवी संस्था, नागरिक एक झाड लावून हा उपक्रम संपन्न करणार आहेत. शहिदांच्या नावाने एक झाड लावून ते जपावे, वाढवावे आणि परिसर स्वच्छ ठेवणे असा या उपक्रमा मागचा संकल्प आहे. शहीद सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान विसरू नये त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावण्यात येणार असून हे झाड केवळ निसर्ग वाढवणार नसून आपल्या मनामध्ये देखील देश प्रेमाची मुळे खोलवर रुजवून प्रकृतीच्या रक्षणासोबत शहिदांना खरी आदरंजली ठरणार आहे.



