आमची मुंबईमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

वर्सोवा मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी के पश्चिम विभागाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे निलंबित आता नंबर कोणाचा??

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग हे अवैध बांधकामचे दलदल आहे त्यामधील वर्सोवा विधानसभा वॉर्ड 59 वर्सोवा गावातील शीव गली येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागाचे प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सोमेश शिंदे – के पश्चिम विभाग मधील निलंबित अधिकारी

प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर कामातील बेजाबदार, निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली झाल्याचे कारण देत त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. (K / west Illegal Construction )

मुंबई महानगर पालिका के-पश्चिम विभागामध्ये सोमेश शिंदे दुय्यम अभियंता (प्रभाग अधिकारी) व प्रभारी सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाना) म्हणून सन २०२२ पासून कार्यरत होते. सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्र.५९,६० व ६३ चा कार्यभार देण्यात होता. प्रभाग क्र. ५९ व ६३ या दोन प्रभागातील मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणातील अनधिकृत फेरफार, मोकळ्या जमिनीवरील बांधकामे विशेषतः भू माफिया यांनी वर्सोवा येथील सागरी किनारा, सीआरझेड व दलदलीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामे करत चार चार माळ्याच्या अवैध इमारती उभ्या केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत होत्या.

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण व सह आयुक्त (परि.-४) विश्यांर्वास शंकरवार यांना प्राप्त होणाऱ्या तक्रारी व इतर प्राप्त तक्रारी सोमेश शिंदे यांना कारवाई करण्याच्या अनुषंगाने नियमितपणे पाठविण्यात येत असल्याचे समोर आले. त्याच सोबत आढावा बैठकीमध्ये या अवैध बांधकामावर तोडक कारवाईसाठी आदेश देऊन कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे. वर्सोवा विधानसभा मधील वार्ड क्रमांक 59 वर्सोवा मधील सीआरझेड व सागरी किनारा येथे मोठ्या प्रमाणात भू माफिया यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई करण्याच्या आवश्यकते बाबत अतिरिक्त आयुक्त व महापालिका आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन ०३ जून २०२४ रोजी अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती.

सदरची तोडक कारवाई परिणामकारक करण्याकरिता प्रभारी सहाय्यक अभियंता सोमेश शिंदे यांना मनुष्यबळ व इतर तयारी करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु बाबत वेळावेळी आढावाही घेण्यात आला. परंतु, शिंदे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आली नसल्याचा ठपका ठेवत विभागाचा प्रभाग अधिकारी व प्रभारी सहाय्यक अभियंता (इ.वका.) म्हणून जबाबदारी असूनही याची जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही. परिणामी सहायक आयुक्तांना इतर प्रभागातील इमारत व कारखाने विभागातील अधिकारी त्याचबरोबर परिरक्षण विभागातील अभियंतांसह मनुष्यबळ व इतर तयारी करुन या ठिकाणची कारवाई करुन घ्यावी लागली.

सोमेश शिंदें विरोधात आधीच होते रडारवर या आधी देखिल त्यांच्यावर झाली होती कारवाई पाणी खात्यामध्ये केली होती बदली

लोकसभा निवडणूक निकाल आधी ३ आणि ४ जून २०२४ रोजी वर्सोवा येथील भू माफिया यांच्या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु असताना सह आयुक्त (परि.-४) विश्वर्वास शकंरवार इतर सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण व के पश्चिम विभाग मधील ईतर अधिकारी दिवसभर उन्हामध्ये उभे असतानाही सोमेश शिंदे यांनी आपला योग्य सहभाग नोंदवला नसल्याच्या आरोप असुन, उलट या कारवाईच्या वेळेत ते आपल्या खासगी गाडीमध्ये एसी लावून होते. तसेच कारवाई पूर्ण होण्या अगोदरच निघून गेले होते. तसेच दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त यांनी के/पू. विभागामध्ये पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांच्यासह शिंदे यांना वैयक्तिक बोलाविले असतानाही कल्पना असूनही सोमेश शिंदे त्या बैठकीला जाणून बुजून बैठकीला दांडी मारली अशी माहिती समोर येते

विश्वास शंकरवार (मुंबई महानगर पालिका- सह आयुक्त झोन 4)

सोमेश शिंदे यांच्यावर सामजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी अनधिकृत गैरहजेरीच्या, कार्यालयामध्ये येत नसल्याच्या, इतरत्र पंचिंग करत असल्याच्या तसेच विशेषतः बाहेर खासगी कार्यालय थाटल्याच्या अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात प्राप्त झाल्या होत्या. अनधिकृत बांधकाम व अनधिकृत फेरफाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त होऊनही या बाबत नोटीसची कारवाई न करणे, के पश्चिम सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चव्हाण आणि सह आयुक्त (परि. ४) विश्र्वास शंकरवार यांनी केलेल्या पाहणीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात बांधकामे विशेषतः वर्सोवा येथे सुरु असलेले बांधकाम आढळून येणे असे प्रकार दिसून आल्याने सोमेश शिंदे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येत आहे.

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभाग सहायक आयुक्त

त्यांना याबाबत निलंबन पत्र देण्यात आले आहे. त्यात सोमेश शिंदे यांच्या बेजाबदार, निष्काळजीपणा व उदासीनतेमुळे महापालिकेची प्रतिमा मलीन झाली आहे. महापालिका आयुक्तांच्या मंजूरी अन्वये वर्सोवा येथील अनधिकृत बांधकामाची खात्यांतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.सा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button