आमची मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

लोअर परळमध्ये ‘द केरला स्टोरी २’च्या विशेष शोला आमदार अमीत साटम यांची उपस्थिती

द केरला स्टोरी २’ चित्रपट केवळ मनोरंजन नसून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण संदेश देणारा अमीत साटम (मुंबई भाजपा अध्यक्ष)

लोअर परळमध्ये ‘द केरला स्टोरी २’च्या विशेष शोला आमदार अमीत साटम यांची उपस्थिती

 

मुंबई : लोअर परळ येथील PVR Phoenix Palladium येथे The Kerala Story 2 या चित्रपटाचा विशेष शो उत्साहात पार पडला. या विशेष प्रदर्शनाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना आमदार साटम यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात निर्माण झालेल्या अडचणींवर न्यायालयाने दिलेला निर्णय हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सत्याचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“सत्य हे अमर असते. कितीही प्रयत्न केले तरी सत्य दडपता येत नाही; शेवटी विजय सत्याचाच होतो,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला भाजपा मुंबई सरचिटणीस व स्वीकृत नगरसेवक श्री प्रतीक कर्पे, चित्रपटाचे निर्माते विपुल शाह तसेच संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी मान्यवरांनी चित्रपटाच्या टीमशी संवाद साधत या धाडसी विषयामागील त्यांची मेहनत आणि जिद्द जाणून घेतली.

 

‘द केरला स्टोरी २’सारख्या विषयावर चित्रपट साकारून समाजात जागृती निर्माण केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button