वीरा देसाई रोडवरील अनधिकृत दुकानावर तोडक कारवाई; नगरसेवक विठ्ठल बंदेरी ऍक्शन मोडवर नागरिकांसाठी फुटपाथ केला मोकळा
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड 65 चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांची अतिक्रमण हटविण्याची मोहीम

वीरा देसाई रोडवरील अनधिकृत दुकानावर तोडक कारवाई; नगरसेवक विठ्ठल बंदेरी ऍक्शन मोडवर नागरिकांसाठी फुटपाथ केला मोकळा

मुंबई, अंधेरी पश्चिम : वीरा देसाई रोड येथील आझाद नगर 3 परिसरातील अनधिकृत दुकानावर आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली. परिसरातील नागरिकांना फुटपाथवरील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने ही कारवाई करण्यात आली.

मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार Ameet Satam यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वार्ड क्रमांक 65 चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली. या कारवाईनंतर नागरिकांसाठी फुटपाथ आणि रस्ता मोकळा झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे संबंधित अतिक्रमण हटविण्यात आले.

कारवाईदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. भविष्यातही अशा प्रकारच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

“सेवा हीच खरी ओळख, आदर्श प्रभागासाठी निर्धार” या भूमिकेतून नागरिकांच्या हितासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने करण्यात येणार असल्याचे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांनी सांगितले.


