आमची मुंबईके पश्चिम विभागमहाराष्ट्रमुंबई चे रस्तेविशेष

अंधेरी पश्चिम मधील सीझर रोड–आझाद नगर क्र. ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न

बाधित नागरिकांना न्याय आणि हक्काचे घर मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आमदार अमीत साटम यांनी प्रकल्पस्थळी दिली प्रत्यक्ष भेट

अंधेरी पश्चिम मधील सीझर रोड–आझाद नगर क्र. ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न

बाधित नागरिकांना न्याय आणि हक्काचे घर मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आमदार अमीत साटम यांनी प्रकल्पस्थळी दिली प्रत्यक्ष भेट

मुंबई :सीझर रोड ते आझाद नगर क्रमांक ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाअंतर्गत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामाला गती मिळावी, तसेच या प्रकल्पात बाधित होणाऱ्या एकाही नागरिकावर अन्याय होऊ नये, या ठाम भूमिकेतून मुंबई भाजपा अध्यक्ष अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम यांना प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

सीझर रोड–आझाद नगर क्र. ३ या कनेक्टिव्हिटी प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून, रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर सीझर रोड आणि आझाद नगर परिसरातील नागरिकांना दळणवळणाचा मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि पुनर्वसनाशी संबंधित प्रश्नांमुळे काम रखडले होते.

मुंबई महानगरपालिका (BMC) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पातील बाधित रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे यावेळी आमदार अमीत साटम यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले. कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे भूमिका घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी महानगरपालिका व SRA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवाशांच्या कागदपत्रांची सविस्तर तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांकडे वैध आणि नियमांत बसणारी कागदपत्रे आहेत, त्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय तात्काळ पुनर्वसनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच, अपात्र ठरवण्यात आलेल्या रहिवाशांच्या तक्रारींचीही स्वतंत्रपणे दखल घेतली जावी आणि नियमांच्या चौकटीत शक्य ते सर्व पर्याय तपासावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होताच रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून या मार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असेही सांगण्यात आले.

“प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळेपर्यंत आणि त्यांना हक्काचे छप्पर मिळेपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील. विकास करताना नागरिकांचे पुनर्वसन आणि मानवी हक्क हे केंद्रस्थानी असले पाहिजेत,” अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

सीझर रोड–आझाद नगर क्र. ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्प पाहणी वेळी आमदार अमीत साटम यांच्या सोबत मुंबई महानगरपालिका (BMC) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) चे अधिकारी व स्थानिक नगरसेवक विठ्ठल बंदेरी, मंडळ महामंत्री समीर साटम उपस्थित होते

या पाहणीमुळे सीझर रोड–आझाद नगर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला नव्याने गती मिळेल, तसेच बाधित नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button