*परभणी येथील संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ वाई बाजार शांततेत बंद ठेवण्यात आले*

*परभणी येथील संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ वाई बाजार शांततेत बंद ठेवण्यात आले*
*माहूर प्रतिनिधी / अविनाश पठाडे*
परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली. हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, या घटनेनंतर परभणीत हिंसाचार उफाळला होता. या काळात परभणीत जाळपोळ, दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन कोठडीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. संविधान प्रेमी तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात आज आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने वाई बाजार येथिल सर्व दुकाने बंद ठेवून व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करुन वाई बाजार शांततेत बंद ठेवण्यात आले आणि वाई बाजार येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शोकसभेचे आयोजन ठेवण्यात आले होते यात मनोज कीर्तने, डॉ. झनक मानकर , अनवर खिच्ची, ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी मनोगत व्यक्त केले आणि सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सपोनी रमेश जाधवर यांना निवेदन देण्यात आले. यात मनोज कीर्तने, डॉ. झनक मानकर, परशराम खंदारे, प्रल्हाद खडसे,अनाथपिंडिक खंदारे , ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे, पत्रकार कैलास बेहेरे , पत्रकार अनवर खीच्ची, दिलिप पठाडे, प्रकाश खडसे, फिरोज खान पठाण, गोविंद पवार, मोबिन शेख, प्रल्हाद खडसे, सिद्धार्थ पारधे, अनिल नवसागरे, सागर खडसे, पत्रकार अविनाश पठाडे, गौतम खडसे, प्रफुल खडसे, निखिल भगत, ऋषिकेश भगत , ऋषिकेश खडसे, अजय खडसे, राज पारधे , विशाल पारधे, श्रीकांत मुजमुले समस्त गावकरी मंडळी अणि संविधान प्रेमी हे सहभागी होते. शोकसभेचे प्रास्ताविक अनाथपिंडिक खंदारे यांनी केले.



