मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागात (K/West) विभागात एक महिन्यांत भ्रष्टाचाराची हॅट्ट्रिक ACB ने केल्या तीन कारवाया; भ्रष्टाचारावरून मोठे प्रश्नचिन्ह
एका महिन्यात तीन कारवाया अधिकारी वर्गाला पाठीशी घालत असल्यामुळे असले प्रकार घडत असल्याचा आरोप

मुंबई महानगर पालिका के पश्चिम विभागात (K/West) विभागात एक महिन्यांत भ्रष्टाचाराची हॅट्ट्रिक ACB ने केल्या तीन कारवाया; भ्रष्टाचारावरून मोठे प्रश्नचिन्ह
सह आयुक्त डॉ भाग्यश्री कापसे बसतात त्याच इमारतीत एका महिन्यात तीन कारवाया अधिकारी वर्गाला पाठीशी घालत असल्यामुळे असले प्रकार घडत असल्याचा आरोप 
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभाग K/West विभागात अवघ्या एका महिन्यांत तीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सलग तीन कारवाया झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर K/West विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत सह आयुक्त डॉ भाग्यश्री कापसे यांचे कार्यालय असून असले प्रकार घडल्याने त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. डॉ भाग्यश्री कापसे आपल्या अधिकारी यांच्यावर वचक नसून नागरिकांच्या व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या अधिकारी यांना पाठीशी घालत असल्यामुळे असले प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, 8 सप्टेंबर 2026 रोजी K/West विभागाच्या Health Department मधील एका लिपिकाला दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ACB ने पकडले. तक्रारदाराकडून यापूर्वी 40 हजार आणि त्यानंतर 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात खाद्य व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी लाचेची मागणी झाल्याचे समोर आले.
यापूर्वीही K/West विभागात Water, Building & Factory आणि Health Department संदर्भात ACB कारवाया झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच विभागातील वेगवेगळ्या खात्यांमध्ये वारंवार लाचखोरीची प्रकरणे समोर येणे ही बाब प्रशासनासाठी चिंतेची ठरली आहे.
सहाय्यक आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्न
15 जून 2024 पासून सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्याकडे K/West विभागाची जबाबदारी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात सातत्याने ACB कारवाया समोर आल्याने विभागातील निगराणी, पर्यवेक्षण आणि प्रशासकीय नियंत्रणाची परिणामकारकता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, केवळ ACB कारवाया झाल्या म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट जबाबदारी किंवा दोष सिद्ध होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका, प्रशासकीय प्रक्रिया आणि ACB तपासातील निष्कर्ष यानुसारच पुढील जबाबदारी निश्चित होऊ शकते.
नैतिक जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर
सलग ACB कारवायांनंतर सहाय्यक आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा का? हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तसेच BMC प्रशासनाने K/West विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची सखोल चौकशी करून निगराणी व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
वारंवार होणाऱ्या ACB कारवाया या केवळ संबंधित कर्मचाऱ्यांपुरत्या मर्यादित राहणार की संपूर्ण विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

