आमची मुंबईगुन्हेगुन्हेमहाराष्ट्रमुंबईविशेषसामाजिक

सात कोटींच्या चोरीचा पर्दाफाश; राजस्थानच्या जंगलात थर्मल ड्रोनच्या मदतीने आरोपींना अटक

मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या घनदाट जंगलात थर्मल ड्रोनचा वापर करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सात कोटींच्या चोरीचा पर्दाफाश; राजस्थानच्या जंगलात थर्मल ड्रोनच्या मदतीने आरोपींना अटक

मुंबई : मुंबई शहरातील एका सराफ दुकानातून तब्बल ६.७९ कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या बोरीवली परिसरात घडलेल्या या खळबळजनक चोरीचा छडा लावत मुंबई पोलिसांनी राजस्थानच्या घनदाट जंगलात थर्मल ड्रोनचा वापर करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील बोरीवली भागात एका सराफ दुकानावर १३ जानेवारी २०२६ रात्री ते १४ जानेवारी पहाटेदरम्यान दरोडा टाकण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून तिजोरी फोडली आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या चोरीत एकूण ६.७९ कोटी रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. ही घटना एम.एच.बी. पोलीस ठाणे हद्दीत घडली होती.

 

गुन्हा दाखल होताच पोलीस दलाने विशेष तपास पथक स्थापन करून शोधमोहीम सुरू केली. तपासात दुकानात काम करणारे प्रभू सिंग आणि नारायण सिंग यांनीच बनावट चावीच्या साहाय्याने तिजोरी उघडून दागिने चोरल्याचे उघड झाले. चोरीनंतर हे दोघे फरार झाले होते.

तपासादरम्यान आरोपी राजस्थानमधील राजसमंद जिल्हा येथील घनदाट जंगलात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी सतत आपले ठिकाण बदलत असल्याने त्यांचा माग काढणे अवघड बनले होते. अखेर पोलिसांनी थर्मल ड्रोनचा वापर करून जंगलात लपलेल्या आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.

या प्रकरणात गणपत सिंग, किशन सिंग आणि मोड सिंग यांनी आरोपींना मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button